देशातील यंदाचा उन्हाळा सामान्य

तापमान नकाशा
तापमान नकाशा

पुणे : देशाच्या बहुतांशी भागात यंदाच्या उन्हाळा (मार्च ते मे) हंगामाचे सरासरी तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोव्यासह, कर्नाटक, केरळचा किनारपट्टीय भाग, वायव्य भारतातील पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, आणि ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यांमध्ये हंगामाचे कमाल तापमान सरारीसपेक्षा ०.५ ते १ अंशांनी अधिक राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. उत्तराखंडमध्ये हंगामाचे तापमान सरासरीपेक्षा १ अंशांची अधिक राहण्याची शक्यता आहे. आयएमडीने शुक्रवारी (ता. १) मार्च ते मे महिन्यातील हंगामाच्या सरासरी तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीतर्फे ‘मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम’ आधारे २०१६ पासून उन्हाळा व व हिवाळा हंगामातील तापमानचा विभागनिहाय अंदाज वर्तविला जात आहे. १९८२ ते २००८ या २७ वर्षांच्या अंदाजांचा विश्लेषणावरून हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. हवामानाच्या फेब्रुवारीतील स्थितीनुसार उन्हाळ्याचे पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे. या मॉडेलनुसार पश्चिम किनारपट्टी, वायव्य भाग आणि ईशान्येकडील राज्यात काही भाग वगळता उर्वरित देशात कमाल किमान तापमान सरासरी इतके राहणार आहे. उष्णतेच्या लाटाही सरासरी इतक्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हिरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग या उष्णतेच्या लाटा येणाऱ्या भागात (कोअर झोन) हंगामाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३७ टक्के आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सामान्य ते सरासरीपेक्षा किंचित अधिक उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com