Agriculture news in Marathi Sunflower excluded from crop insurance on Tuesday | Page 2 ||| Agrowon

मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

मंगळवेढा तालुक्यात सूर्यफुलाचे क्षेत्र बऱ्यापैकी असताना, यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा योजनेतून सूर्यफुलाला तर वगळलेच. पण तालुक्यात अस्तित्वातच नसलेल्या कापूस पिकाचा समावेश करण्यात आला आहे.

मंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात सूर्यफुलाचे क्षेत्र बऱ्यापैकी असताना, यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा योजनेतून सूर्यफुलाला तर वगळलेच. पण तालुक्यात अस्तित्वातच नसलेल्या कापूस पिकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांची ही निवड नेमकी कशाआधारे केली जाते, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मंगळवेढा तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर हा दुष्काळी पट्ट्यात येत असल्यामुळे या भागातील शेती लहरी पावसावर अवलंबून आहे. तालुक्यामध्ये यापूर्वी सात महसूल मंडल कार्यरत होते. यंदापासून पाठखळ हे नवीन महसूल मंडल कार्यान्वित झाले. खरिपामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, उडीद, कांदा, हुलगे, मटकी ही पिके घेतली जातात. आठ ही महसूल मंडळामध्ये कापसाचा विमा भरण्याची आवाहन केले जाते. प्रत्यक्षात कापसाचे क्षेत्र नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या सूर्यफूल पिकाला वगळले जाते. दोन वर्षांमध्ये कमी पाण्यात व चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी शेतकरी करत आहेत.

मंगळवेढा तालुक्यामध्ये सूर्यफुलाचे क्षेत्र वाढल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला, अशा परिस्थितीत या पिकाला विमा संरक्षण देणे आवश्यक आहे. पण कापूस नसताना कापसाचा समावेश केला, यामागे काय गौडबंगाल आहे.
- चंद्रशेखर कौडुभैरी, कृषी केंद्रचालक, मंगळवेढा

कापसाचे क्षेत्र नसताना त्याच्या विम्यासाठी कंपन्या कशा काय आग्रह करू शकतात. वास्तविक पाहता ज्या पिकांचे तालुक्यामध्ये क्षेत्रच नाही, त्याचा समावेश कसा काय करण्यात आला. सूर्यफुलासाठी आमची मागणी आहे, पण त्याबाबत विचारही होत नाही, यामागे आम्हाला संशय वाटतो. 
- श्रीमंत केदार, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...