Agriculture news in marathi Sunflower germination in Sangola Complaints, inspection by authorities | Agrowon

सांगोल्यातील पारेत सूर्यफूल उगवणीच्या तक्रारी, अधिकाऱ्यांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

सांगोला, जि. सोलापूर : सोयाबीनच्या बियाणाची उगवण झाली नसल्याचे प्रकार जिल्ह्यात सगळीकडेच उघडकीस येत असताना, आता सांगोला तालुक्यात पारे गावातून सुर्यफुलाच्या बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

सांगोला, जि. सोलापूर : सोयाबीनच्या बियाणाची उगवण झाली नसल्याचे प्रकार जिल्ह्यात सगळीकडेच उघडकीस येत असताना, आता सांगोला तालुक्यात पारे गावातून सुर्यफुलाच्या बियाण्यांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तालुका कृषि अधिकारी दीपाली जाधव आणि कृषि विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने शेतावर जाऊन पाहणी केली. तेव्हा, अत्यंत कमी प्रमाणात, तुरळक असे सुर्यफूल उगवल्याचे निदर्शनास आले. 

सांगोला तालुक्यात यंदाच्या खरिपात आतापर्यंत ७३ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. त्यात तालुक्यातील पारे गावात हणमंत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सुखदेव गायकवाड, सुरेश गायकवाड यांच्या शेतात पेरलेल्या सूर्यफुलाची उगवण झाली नसल्याच्या तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली. पुरेसा पाऊस आणि चांगली ओल असताना पेरणी करुनही सूर्यफूलाच्या बियाण्यांची उगवण होऊ शकली नाही, याकडे या शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीत लक्ष वेधले. तसेच प्रमाणित कंपन्यांच्या बियाण्यांची माहितीही दिली. 

दरम्यान, स्वत जाधव, पंचायत समितीचे कृषि अधिकारी विकास काळोखे, जवळा मंडल कृषी अधिकारी जांभळे, पारेचे कृषी सहायक एच.टी. पवार यांनी थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा, त्यांच्याही निदर्शनास शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार बियाणे उगवण झाले नसल्याचे दिसून आले. याबाबतचा अहवाल तयार करुन योग्य ती कार्यवाही करु, असे आश्वासन कृषि अधिकारी जाधव यांनी दिले.  

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...