agriculture news in marathi, sunil tatkare demand to give a compensation for paddy growers, ratnagiri, maharashtra | Agrowon

कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार द्या : सुनिल तटकरे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भातशेतीकरिता भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, यासाठी शासन दरबारी लढा देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला. तसेच सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीला सामोरे जाताना सरकारने संवेदना ठेवून काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भातशेतीकरिता भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, यासाठी शासन दरबारी लढा देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला. तसेच सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीला सामोरे जाताना सरकारने संवेदना ठेवून काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार इतर गोष्टींवर अधिक भर देत आहे. जनजीवन सुरळीत करण्यासाठी लोकांना मोकळ्या वातावरणात ठेवण्याची गरज आहे; मात्र मंत्र्यांविरोधात वातावरण होत असल्याचे कारण देत जमावबंदी करत आहे. हे लोकशाहीला घातक असून सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतली पाहिजे. २००५ मध्ये निर्माण झालेल्या स्थितीला काँग्रेस आघाडीचे सरकार चांगल्या पध्दतीने सामोरे गेले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा अनुभव सरकारने विचारात घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सहकार्य करण्यास तयार आहे. शासनाकडून तत्काळ मदत वाटप होणे गरजेचे आहे.

पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणातील जिल्ह्यांनाही पुराचा फटका बसला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती पुराच्या पाण्यात राहिल्यामुळे भातपीक कुजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळणे गरजेचे आहे. येथील भौगोलिक स्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई मिळावी, यासाठी आम्ही शासनदरबारी प्रयत्न करणार आहोत. शासनाने जाहीर माणशी पाच हजार रुपये मदत प्रत्येकाला द्यायला हवी होते. हा प्रस्ताव घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...