देगाव कालव्याच्या प्रकल्पाला ‘सुप्रमा'

देगाव कालव्याच्या प्रकल्पाला ‘सुप्रमा'
देगाव कालव्याच्या प्रकल्पाला ‘सुप्रमा'

सोलापूर : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यासाठी महत्त्वाच्या असलेल्या देगाव कालव्याच्या कामाला सुधारित प्रशासनाकीय मंजुरी मिळाल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही तालुक्‍यांतील जवळपास दहा हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्राला लाभ होईल.

भीमा-उजनी प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या प्रकल्पातील कामास मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २०१५-१६ च्या दरसुचीनुसार या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी २२०९.५२ कोटी खर्च अपेक्षित आहे, तसेच अनुषंगिक खर्च ४१२.६८ कोटी असा एकूण २६२२.२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

या प्रकल्पात पहिल्यापासूनच अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे दोन्ही तालुके उपेक्षित राहिले. उजनी धरणाच्या पाण्याचा वापर हा ‘टेल टू हेड'' असा व्हायला हवा, तसे धोरण आहे, पण अद्यापपर्यंत त्याबाबत केवळ आश्‍वासनेच शेतकऱ्यांना मिळाली, पण या प्रकल्प मंजुरीने हा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यानुसार देगाव कालव्याच्या टप्पा क्रमांक २७ ते ६४ काम पूर्णत्वास जाणार आहे. 

या कामानंतर या कालव्याच्या आधारे होटगी तलाव, शिरवळ धुबधुबी तलाव, करजगी तलाव भरणार असून, पुढे तडवळ, नागणसूर, शावळ आणि घुंगरेगाव आदी अक्कलकोट भागात सिंचन व्यवस्था निर्माण होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com