पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद 

कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी पुण्यात उद्यापासून (ता.१३) सुरू होत असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये भाजीपाला व फळांचा पुरवठा देखील बंद राहणार आहे.
Transport
Transport

पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी पुण्यात उद्यापासून (ता.१३) सुरू होत असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये भाजीपाला व फळांचा पुरवठा देखील बंद राहणार आहे. 

लॉकडाउनमध्ये २३ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहरात फक्त औषधे आणि दूध पुरवठ्याला मान्यता देण्यात आली आहे. पहिले पाच दिवस आवश्यक वस्तूंचा पुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. पोलिसांकडून त्याबाबत अतिशय सक्तीची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही स्थितीत रस्त्यावर येऊ नये. यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 

पहिल्या पाच दिवसांच्या कडकडीत लॉकडाउनमध्ये दूध, औषधे, रुग्णालयांचे काम वगळता कोणतीही व्यवस्था अथवा पुरवठा चालू ठेवली जाणार नाही, असे पुणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांना या कालावधीत घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यानंतरच्या पाच दिवसात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू चालू केली जाणार आहे. 

पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, आत्तापर्यंतच्या लॉकडाउनमध्ये पुणे बाजार समितीमधील व्यवहारासाठी पासेस वाटले गेले होते. मात्र, या लॉकडाउनशी पासेसचा काहीही संबंध नाही. बाजार समितीचे व्यवहार चालविण्यासाठी किमान साडेचार हजार पासेस वाटावे लागतात. १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनमध्ये भाजीपाला व फळांबाबत पुरवठ्याचे नियोजन केलेले नाही. प्रशासनाने फक्त दूध व औषधांना मान्यता दिली आहे. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवली जाणार आहे.  आढावा घेऊन पुढील नियोजन  लॉकडाउन कडकडीतपणे अमलात आणले जाणार असल्याने पुण्याकडे येणारा रोजचा ७०० गाडी भाजीपाला व ७० गाडी अन्नधान्याचा पुरवठा देखील बंद राहणार आहे. ही स्थिती शनिवारपर्यंत कायम राहील. त्यानंतर आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे, असेही पणन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com