agriculture news in Marathi supply of agriculture produce will be stop Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद 

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी पुण्यात उद्यापासून (ता.१३) सुरू होत असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये भाजीपाला व फळांचा पुरवठा देखील बंद राहणार आहे. 

पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी पुण्यात उद्यापासून (ता.१३) सुरू होत असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये भाजीपाला व फळांचा पुरवठा देखील बंद राहणार आहे. 

लॉकडाउनमध्ये २३ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहरात फक्त औषधे आणि दूध पुरवठ्याला मान्यता देण्यात आली आहे. पहिले पाच दिवस आवश्यक वस्तूंचा पुरवठा देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. पोलिसांकडून त्याबाबत अतिशय सक्तीची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही स्थितीत रस्त्यावर येऊ नये. यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 

पहिल्या पाच दिवसांच्या कडकडीत लॉकडाउनमध्ये दूध, औषधे, रुग्णालयांचे काम वगळता कोणतीही व्यवस्था अथवा पुरवठा चालू ठेवली जाणार नाही, असे पुणे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांना या कालावधीत घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यानंतरच्या पाच दिवसात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू चालू केली जाणार आहे. 

पणन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, आत्तापर्यंतच्या लॉकडाउनमध्ये पुणे बाजार समितीमधील व्यवहारासाठी पासेस वाटले गेले होते. मात्र, या लॉकडाउनशी पासेसचा काहीही संबंध नाही. बाजार समितीचे व्यवहार चालविण्यासाठी किमान साडेचार हजार पासेस वाटावे लागतात. १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनमध्ये भाजीपाला व फळांबाबत पुरवठ्याचे नियोजन केलेले नाही. प्रशासनाने फक्त दूध व औषधांना मान्यता दिली आहे. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवली जाणार आहे. 

आढावा घेऊन पुढील नियोजन 
लॉकडाउन कडकडीतपणे अमलात आणले जाणार असल्याने पुण्याकडे येणारा रोजचा ७०० गाडी भाजीपाला व ७० गाडी अन्नधान्याचा पुरवठा देखील बंद राहणार आहे. ही स्थिती शनिवारपर्यंत कायम राहील. त्यानंतर आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे, असेही पणन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 
 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...