बार्शीतील रेशनच्या धान्य काळाबाजाराप्रकरणी पुरवठामंत्र्यांचे चौकशीचे आदेश

सोलापूर ः पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना बार्शीसह जिल्ह्यातील सर्वच धान्य वाटपाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
Supply Minister orders inquiry into black market of ration grains in Barshi
Supply Minister orders inquiry into black market of ration grains in Barshi

सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य पनवेलमध्ये (मुंबई) जप्त करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतरही बार्शी आणि वैरागमध्ये पुन्हा दोनदा रेशनचे गहू आणि तांदळाची साठेबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला. लागोपाठ घडलेल्या या प्रकारानंतर पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना बार्शीसह जिल्ह्यातील सर्वच धान्य वाटपाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता.११) संपूर्ण राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. राज्यासह जिल्ह्यातील धान्य वाटपाबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री भुजबळ यांनी बार्शी तालुक्यातील धान्य वाटपाची माहिती घेतली. 

पनवेल पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. जे धान्य आढळून आले आहे, ते बार्शी तालुक्यातील आहे का? असेल तर कोणत्या दुकानातून ते खरेदी करण्यात आले? खरेदीदार कोण? याबाबतची चौकशी करावी व त्याचा अहवाल सादर करावा, अशा सक्त सूचना पुरवठामंत्री भुजबळ यांनी पुरवठा अधिकारी पाटील यांना दिल्या.

तसेच बार्शीच नाही, तर जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील धान्य वाटपाचीही माहिती घेऊन अहवाल द्या, असेही मंत्री भुजबळ यांनी पुरवठा अधिकारी पाटील यांना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com