agriculture news in Marathi, Supply of Onion reduced by 75 percent, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कांदा आवक ७५ टक्के मंदावली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यात व साठवणूक मर्यादा घातल्याचा मोठा परिणाम कांदा आवकेवर झाला आहे. निर्णयापूर्वीच्या आणि सध्याच्या कांदा आवकेत सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बाहेर समित्यांमधील लिलावातून ही माहिती समोर आली आहे. 

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यात व साठवणूक मर्यादा घातल्याचा मोठा परिणाम कांदा आवकेवर झाला आहे. निर्णयापूर्वीच्या आणि सध्याच्या कांदा आवकेत सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बाहेर समित्यांमधील लिलावातून ही माहिती समोर आली आहे. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारणत: दहा ते बारा हजार क्विंटलची आवक या होत असते. मात्र, कांद्याची आवक घटत आहे. कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लासलगावला कांद्याची आवक ९५०० क्विंटल झाली होती. शुक्रवारी (ता. ४)पर्यंतच्या लिलावात कांद्याची आवक सरासरी २३०० ते २५०० क्विंटल पर्यंत झाली. दैनंदिन आवक ७० ते ७५ टक्क्यांनी घटली आहे. 

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सोमवार (ता. ३०) रोजी कांद्याची आवक ८७०१ क्विंटल झाली होती. तीच शनिवारी (ता. ५) २६११ क्विंटल झाली. शेवटच्या टप्प्यातील जो काही शिल्लक कांदा आहे, तो कळवण, बागलाण व देवळा तालुक्यांतील अधिक आहे. मात्र, अशीच जर आवक घटत राहिली तर कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा होण्यात मोठी अडचण येणार आहे.

खरिपातील नवीन कांदा बाजारात येण्यास अजून १ महिन्याचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शासनाने कांदा निर्यात व साठवणुकीबाबत निर्बंधामुळे ही स्थितीनिर्माण झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.  

दररोजचा आढावा घेतला जातोय
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकरी संघटनेमार्फत आजपासून (ता. ७) पासून कामकाम होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कांद्याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमार्फत व्यापाऱ्यांकडून रोज होणाऱ्या खरेदी-विक्रीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...