Agriculture news in marathi Supply Oxygen, Remedisivir: Chief Minister Thackeray | Page 3 ||| Agrowon

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः मुख्यमंत्री ठाकरे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून, रेमडेसिव्हिरचा पुरेसा पुरवठ्याची ही आवश्यक आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दूरदृशप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केली. 

मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून, रेमडेसिव्हिरचा पुरेसा पुरवठ्याची ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गांनी राज्याला मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दूरदृशप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केली. 

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का, यावर मार्गदर्शन करावे. रेमडेसिव्हिर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे, त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा.’’ 

आम्ही राज्याच्या अर्थचक्राला झळ बसू नये याची काळजी आणि खबरदारी घेत, राज्यात संपूर्णपणे टाळेबंदी न करता दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्यात आले असून, ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच असा आत्मविश्‍वास देखील या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत. तसेच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी ही माहितीही दिली. 

रेमडेसिव्हिर, लसपुरवठा वाढवा 
रेमडेसिव्हिर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राकडून तो पुरवठाही नियमित होत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक 
राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ झाली. यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबाबत योग्य तो अभ्यास व्हावा. तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे, जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

कोविड सुसंगत कार्यप्रणालीवर भर 
आम्ही उद्योजक, कामगार तसेच इतरांशी सातत्याने बोलत असून, तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे आहे. यात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याबरोबर, कामाच्या वेळा आणि पद्धतीत फरक करणे आवश्यक असल्याचे आपण सांगितल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी पंतप्रधानांना सांगितले. 

राज्याची गरज 
ऑक्सिजन
 

  • महाराष्ट्राला दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता 
  • सुमारे ३५० टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. 
  • रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुमारे ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे. 
  • रेल्वेने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता. 
  • केंद्र शासनाकडे १३ हजार जम्बो सिलिंडर व सुमारे १ हजार १०० व्हेंटिलेटर्सची मागणी. 

रेमडेसिव्हिर 
रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिव्हिरमुळे कमी होतो. परिणामी, ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडता आहे. राज्याला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे वाटप रेमडेसिव्हिर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असल्याने रेमडेसिव्हिर आयात करायला परवानगी देण्यात यावी. 

लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने 
राज्याला लसीचा पुरवठा खूप धीम्या गतीने होत आहे. काल २२ एप्रिल रोजी सकाळी आपल्याकडे ६ लाख ५० हजार डोस उपलब्ध होते. त्यापैकी दिवसभरात ३ लाख ५० हजार डोस वापरण्यात आले. तसेच २ लाख लसींचा पुरवठा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार सद्यःस्थितीत मी आपल्या सोबत बोलत असताना राज्यात सुमारे ५ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. महाराष्ट्र लसीकरणात संपूर्ण देशात नंबर एकचे राज्य आहे. त्यामुळे राज्याला शाश्‍वत व नियमित लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली. 

१२ कोटी डोसेसची आवश्यकता 
लसीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच कॉपोरेट समूहाच्या रुग्णालयांना लस पुरविली आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी अधिक स्पष्टता हवी. लसींची आयात करण्याची परवानगी राज्याने मागितली, तर ती मिळायला हवी. कारण महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटांतील लोकसंख्या ही ५ कोटी ७१ लाख असून, त्यासाठी लसीकरणासाठी १२ कोटी डोसेसची आवश्यकता आपल्या देशातील लस उत्पादक एवढ्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने त्याचा पुरवठा करू शकणार नाहीत. खासगी कॉपोरेट्‌स समूहांना सीएसआरच्या माध्यमातून उत्पादकांकडून लस खरेदीची परवानगी द्यावी, अशी मागणीही या वेळी ठाकरे यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...