परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

परभणी : यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी विविध पिकांच्या एकूण १७ हजार १७४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. मंगळवार (ता.२७) पर्यंत एकूण ३ हजार ३५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली.
Supply of seventeen thousand quintals of seeds in Parbhani district
Supply of seventeen thousand quintals of seeds in Parbhani district

परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी विविध पिकांच्या एकूण १७ हजार १७४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. मंगळवार (ता.२७) पर्यंत एकूण ३ हजार ३५ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. विविध ग्रेडचा १६ हजार ५४८ टन खतसाठा शिल्लक आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख १५ हजार ९६२ हेक्टर आहे. गतवर्षी २ लाख ५३ हजार ६१० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा (२०२०) २ लाख ८७ हजार ५० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांकडे मिळून एकूण ४६ हजार ८६ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यात ज्वारीच्या २ हजार ४१५ क्विंटल, गव्हाच्या १७ हजार क्विंटल, हरभऱ्याच्या २६ हजार २५० क्विंटल, करडईच्या १९९ क्विंटल, इतर ३५ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

मंगळवार (ता.२७) पर्यंत महाबीजकडून ९ हजार ५९५ क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून २ हजार ६ क्विंटल, कृभको कडून ५२० क्विंटल, खासगी कंपन्यांकडून ५ हजार ५३ क्विंटल असा एकूण १७ हजार १७४ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

ज्वारीचे ५१६ क्विंटल, गव्हाच्या ४ हजार ६७२ क्विंटल, हरभऱ्याच्या ११ हजार ९२० क्विंटल, करडईच्या ६६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. आजवर ३ हजार ३५ क्विंटल बियाण्याची विक्री झाली आहे. त्यात ज्वारीचे ८६ क्विंटल, गव्हाचे ७८ क्विंटल, हरभऱ्याचे ६ हजार २३२ क्विंटल, करडईच्या ३ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. एकूण १४ हजार १३९ क्विंटल  बियाणे शिल्लक आहे.

१६ हजार टन खतसाठा शिल्लक

यंदाच्या रब्बी हंगामासाठी ९९ हजार ५०० टन खतांची मागणी करण्यात आली. परंतु, ५५ हजार ९९० टन खतसाठा मंजूर झाला. एक ऑक्टोबर रोजी १७ हजार ३९५ टन खतसाठा शिल्लक होता. रब्बीमध्ये ५ हजार ५९२ टन खतांचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण २२ हजार ९८७ टन एवढा खतसाठा शिल्लक होता.

आजवर ६ हजार ४३९ टन खतांची विक्री झाली आहे. एकूण १६ हजार ५४८ टन खतसाठा शिल्लक आहे. त्यात युरिया ४ हजार ४५० टन, सुपर फॉस्फेट १ हजार ६१७ टन, पोटॅश ३ हजार टन, डीएपी १ हजार १३ टन, संयुक्त खते (एनपीके) ६ हजार ४५७ टन या खतांचा समावेश आहे, असे ममदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com