Agriculture news in marathi Supply of vegetables directly to the customers through farmers group | Agrowon

औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना थेट भाजीपाला पुरवठा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला घेण्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांमार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला घेण्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांमार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी येथे भाजीपाला व फळे यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी फळे व भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक व्यापारी यांची मोठी गर्दी होते व सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. यामुळे कोरोना रोगाचे संक्रमण होण्याचा धोका संभवतो. 

औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गटांनी भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विकण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. अशा शेतकरी गटाची माहिती कृषी विभागाने गोळा केली आहे व ती महानगरपालिकेला दिली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी अशा शेतकरी गटांना मोठ्या कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीशी जोडून देणार आहेत. भाजीपाला व फळे विक्रीच्या ठिकाणी गर्दी टाळावी म्हणून ते शेतकरी गट विशिष्ट वजनाच्या चार ते पाच भाज्यांची एक थैली करणार आहेत. 

शेतकरी गटाकडून भाजीपाला विक्री... पहा video

 

शेतकरी गट कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीचे अध्यक्ष/ सचिव यांना दररोज किती भाजीपाला लागणार याची माहिती घेऊन या भाजीपाल्याच्या पिशव्या अध्यक्ष किंवा सचिव यांना पैसे घेऊन सुपूर्द करणार आहेत. काही शेतकरी गटांनी भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधलेला आहे. 
आणखीही काही शेतकरी गटांना आपला भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करायचा असेल तर त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. त्याचबरोबर आपले तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तसेच आत्माचे बीटीएम/ एटीएम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डाॅ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.

संपर्क अधिकारी आणि यांचे क्रमांक

  • अनिल कुमार हदगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी औरंगाबाद ः ९४२१३१६०९३
  • विश्वास जाधव,  मंडळ कृषी अधिकारी, औरंगाबाद ः ९८३४६३९०८९ / ९४ २२९०५१९२
  • रंगनाथ पिसाळ, कृषी सहायक औरंगाबाद ः ८२०८६६५३४४/ ९४०४६८०५०८

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...