पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी सुरळीत

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते.
Supply of vegetables in Pune, demand smooth
Supply of vegetables in Pune, demand smooth

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून तीन ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची ७ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती आवक झाली होती. तर, कोबी ५ टेम्पो, फ्लॉवर आणि सिमला मिरची प्रत्येकी ७ टेम्पो, भेंडी ५ तर गवार ५ टेम्पो, टॉमेटो ७ हजार क्रेट, गाजर ३ टेम्पो, घेवडा २ टेम्पो, भुईमूग शेंगा ५० गोणी, तांबडा भोपळा ७ टेम्पो, गावरान कैरी ५ टेम्पो,  तर कांद्याची ७० ट्रक आवक झाली होती. कांद्याची आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : १००-१३०, बटाटा : ९०-१३०, लसूण : ३००-६००, आले : सातारी १००-१८०, भेंडी : १५०-२००, गवार : १५०-२००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : १००-१२०, चवळी : १००-१५०, काकडी : ८०-१२०, कारली :  हिरवी २००-२५०, पांढरी १५०-१६०, पापडी : ३५०-४००, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : १००-१६०, गाजर : १००- २०० वालवर : ४००-४५०, बीट : ८०-१००, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : २००-२२०, पावटा : ४००-४५०, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार - ७००-८००,  तांबडा भोपळा : १००-१२०, सुरण : १६०-१८०, तोतापुरी कैरी - १००-१५०, गावरान - १००-१२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) :  १०००-१६००. 

पालभाज्याचे शेकड्याचे दर 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे २, तर मेथीची सुमारे १ लाख जुड्या आवक झाली होती.  कोथिंबीर - १००-१०००, मेथी ५००-१०००, शेपू  ७००-१०००, कांदापात - १०००-१५००, चाकवत ५००-६००, करडई - ३००-५००, पुदिना १००-२००, अंबाडी ३००-४००, मुळे ६००-१०००, राजगिरा ४००-५००, चुका ५००-६००, चवळई - ३०-५००, पालक  ८००-१२००.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com