Agriculture news in marathi Supply of vegetables through farmer groups in Buldana | Agrowon

बुलडाण्यात शेतकरी गटांमार्फत भाजीपाला पुरवठा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

बुलडाणा ः लॉकडाऊन सुरू असल्याने लोकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करू नये. शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री अभावी पडून राहू नये व ग्राहकांना ताजा भाजीपाला एकाच वेळी घरपोच मिळावा. या संकल्पनेतून कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्याअंतर्गंत स्थापन झालेल्या शेतकरी गटांमार्फत बुलडाण्यात नागरिकांना भाजीपाला पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याहस्ते व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, तालुका कृषी अधिकारी ए. ओ. चोपडे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. 

बुलडाणा ः लॉकडाऊन सुरू असल्याने लोकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करू नये. शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री अभावी पडून राहू नये व ग्राहकांना ताजा भाजीपाला एकाच वेळी घरपोच मिळावा. या संकल्पनेतून कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्याअंतर्गंत स्थापन झालेल्या शेतकरी गटांमार्फत बुलडाण्यात नागरिकांना भाजीपाला पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याहस्ते व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक, तालुका कृषी अधिकारी ए. ओ. चोपडे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. 

बुलडाण्यात ‘कोरोना’ बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण शहरात संचारबंदी सुरू आहे. वाहने जाण्या-येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा स्थितीत शहरातील नागरिकांना दैनंदिन आहारात अत्यावश्यक असलेला सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच बास्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचे काम नांद्राकोळी येथील समृद्ध शेतकरी गट व माऊली शेतकरी गटामार्फत केले जाणार आहे. 

यासाठी ग्राहक भाजीपाल्याची बास्केट दूरध्वनी क्रमांक ९७६६९२३६०१ व ९४२३४४७७६३ यावर बुकींग करू शकणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...