परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पाठबळ देणार : कृषिमंत्री भुसे
नाशिक : मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रिया उद्योग हे शेतीपूरक उद्योगांचे आदर्शवत उदाहरण आहे.
नाशिक : ‘‘मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रिया उद्योग हे शेतीपूरक उद्योगांचे आदर्शवत उदाहरण आहे. याद्वारे शेतकऱ्यांना विकासाची एक नवी दिशा मिळत आहे. अशा शेतीपूरक उद्योगांना शासनस्तरावर पाठबळ देवून चालना देणार आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील मधुमक्षिकापालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रिया उद्योग व आदर्श गाव प्रतिकृतीची भुसे यांनी पाहणी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील, निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ, व्ही. के. राठोड आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, ‘‘मधुमक्षिकापालन प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणाद्वारे तरुण शेतकऱ्यांना निश्चितच रोजगाराची संधी निर्माण होतील. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतीवर आधारित अनेक उद्योग प्रकल्प राज्यभरात राबविले जात आहे. यात फळांवर प्रक्रिया, कोल्ड स्टोअरेज, गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीला भविष्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.
‘‘पुढील आठवड्यात कृषी विद्यापीठाचे अधिकारी या ठिकाणी भेट देऊन हा प्रकल्प तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहचविता येईल, याचे नियोजन करतील,’’ असे भुसे यांनी सांगितले.
- 1 of 1064
- ››