agriculture news in Marathi support to cane chopping labor corporation Maharashtra | Page 2 ||| Agrowon

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी देणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्यात येणार आहेत.

मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिली.

राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या, प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता.२७) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, संजय खताळ आदी उपस्थित होते.

राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले.

ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच महामंडळाला स्वायत्त व सक्षम बनवण्यासाठी करण्यात येणारी नियमावली याबाबतची सविस्तर माहिती यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
महामंडळाचे प्रादेशिक स्तरावर कार्यालय, कंपनी कायद्या अंतर्गत नियमावली बनवणे, ऊसतोड कामगार, पशू, वाहने आदींची नोंदणी करून ओळखपत्र देणे, नवीन पदांना मंजुरी देणे, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थ साहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे, भोजन योजना, ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्याच्या विविध योजना, त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार यांच्यासाठी विमा योजना, यासह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने कामकाज सुरु करा
महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश श्री. शरद पवार यांनी दिले.


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...