‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’ला प्रतिसाद

अकोला  जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे बँक खात्याला   आधार लिंक करण्यास प्रतिसाद
अकोला जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार लिंक करण्यास प्रतिसाद

अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात काही त्रुटी राहल्याने त्यात दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता. २१) विशेष मोहीम राबविली. याला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे १८ हजार ८४७ शेतकऱ्यांची माहिती जुळविण्यात आली.  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या नेतृत्वात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आधार लिंक करण्यासाठी ग्रामस्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदारांकडून त्यासाठी गावनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक गावात सीएससी केंद्रचालक उपस्थित होते. या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने १५ गावांकरिता एक याप्रमाणे नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच जिल्हा स्तरावरून तालुका निहाय नोडल अधिकारीसुद्धा नियुक्त करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे अकोला तालुका, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे बार्शी टाकळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले बाळापूर, उपजिल्हाधिकरी राहल वानखडे पातूर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे अकोट, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्याकडे मूर्तिजापूर आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक ताराणिया यांच्याकडे तेल्हारा तालुक्याची जबाबदारी होती. या मोहिमेत १८ हजार ८४७ शेतकऱ्यांची नावे आधारप्रमाणे जुळवून घेण्यासाठी माहिती संकलीत करण्यात आली.  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आधारप्रमाणे जुळवून घेण्याचे काम सुरू राहणार असून उर्वरित  शेतक-यांनी आपल्याजवळील सीएससी केंद्रावर जाऊन आपली नावे आधारप्रमाणे जुळवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तालुकानिहाय गोळा झालेली माहिती (शेतकरी संख्या)  अकोला १७४०,  अकोट ६७७४, बाळापूर १२१६, बार्शीटाकळी १५१२, मूर्तिजापूर ४५५२, पातूर ८३८, तेल्हारा २२१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com