अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळ

अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळ
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळ

अकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने समाजातील गरजवंतांना आर्थिक मदत दिली जाते. संस्थेच्या वतीने राबविला जात असलेला हा सामाजिक उपक्रम सर्वत्र कौतुकास्पदच ठरत आहे. मागील अनेक वर्षांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना स्वनिधीतून थेट आर्थिक मदत देत आहे. या वर्षी ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना मदत वितरित झाली. याबाबत लाभार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मदतीबाबतच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या वेळी बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे व इतर उपस्थित होते. या सोहळ्यात ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली त्यात श्रीमती सविता अटकर, श्रीमती सावित्रीबाई भगत, श्रीमती अंजनाबाई ढोकणे, श्रीमती मंदाबाई शेगावकर, विजय श्रीहरी झटाले, श्रीमती चित्रा चोपटे, माधवराव गोंविदराव देशमुख, मंगला सिद्धार्थ तेलगोटे, श्रीमती संगीता तायडे, वंदना थोरात, उषा बोळे, श्रीराम चोपडे, सुभाष च्क्रनारायण, संध्या दामोदर, सुरेश गवळी, अनिल सांभारे, शारदा सावंग यांचा समावेश होता.  ट्रॅक्टर अनुदानासाठी दिनेश यादव, प्रकाश थोटे, अविनाश खंडारे, संजय महल्ले, एकनाथ गावंडे, समाधान तायडे, संतोष शिंदे, सुभाष भगत, दादाराव राणे, बळीराम शिरसाट यांना मदत देण्यात आली. शेतकरी कुटुंबातील गुणवंत असलेल्या रेणुका उमाळे, गौरी झांबरे, भारती बाजड, अनिरूद्ध देशमुख, आनंद काकड, निखिल इंगळे, सौरभ लोथे, पूजा निलखन, मयूरी बोपटे, तेजश्री तायडे, प्रतीक्षा सोनेकार, अतुल पागृत, धनश्री मेहरे, चैतन्य गांवडे, शे. गुफरान शे. बहार यांना शिष्‍यवृत्ती अनुदान वाटप करण्यात आले. याशिवाय, विशेष कार्य करणाऱ्यांमधअये एमपीएससी उत्तीर्ण वैशाली सांगळे, विद्यापीठातून व्दितीय मेरिट काजल गावंडे, संत गाडगेबाबा आपात्कालीन पथकाचे दीपक सदाफळे, महाराष्ट्राचा सर्वोकृष्ट वक्ता अक्षय राऊत, गिर्यारोहक धीरज कळसाईत, बायोडायनामिक जैविक शेती पुरस्कर्ते मानसी चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. बाजार समितीने अशी केली आजवर मदत

  • ९५८ दुर्धर आजार रुग्ण शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार (वर्ष १९९६ पासून) ४७ लाख ८९ हजार
  • आत्महत्या केलेल्या २४३ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपये (वर्ष २००६ पासून) ४८ लाख ६० हजार 
  •  सर्पदंश, वीज पडून अथवा अपघाती मृत्यू झालेल्या १९२ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २० हजार रुपये (वर्ष २००७ पासून) ३८ लाख ४० हजार
  •  गुरांचे अपघाती मृत्यू झालेल्या ४६६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ३ ते ५००० प्रमाणे (वर्ष २००९ पासून) २१ लाख १० हजार
  • शिष्यवृत्ती वाटप उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या १५६२ पाल्यांना १० हजारप्रमाणे (वर्ष २०१६ पासून) एक कोटी ५६ लाख २० हजार
  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्याकरिता २५ हजार व अवजारेकरिता १० हजारप्रमाणे एकूण ४४० पात्र शेतकऱ्यांना वाटप (वर्ष २०१६ पासून ) ९३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सिंचन करण्याकरिता 
  • मोटर पंप खरेदीकरिता १० हजारप्रमाणे १३५ शेतकऱ्यांना १३ लाख ५० हजार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com