देशी गायी गोसंगोपनातून सेंद्रीय शेतीलाही बळ 

वडने (ता.धुळे) येथील शेतकरी दिलीप रामदास पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून देशी गायींचे संगोपन करीत आहे.
farmer
farmer

धुळे ः वडने (ता.धुळे) येथील शेतकरी दिलीप रामदास पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून देशी गायींचे संगोपन करीत आहे. आपली शेती रसायनमुक्त केली असून, त्यांच्या सेंद्रीय शेतमालाची खरेदी पुण्यातील कंपनी २५ टक्के अधिक दरात करते. 

सेंद्रीय शेतीत उत्पादकता कमी होते, असा समजही त्यांनी दूर केला आहे. सुरवातीला २५ गायी होत्या. दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात संख्या कमी केली. गायी मोफत शेतकऱ्यांना दिल्या. सध्या १२ गायी आहेत. सहा एकर शेती आहे. त्यात एकरभर सीताफळ आहे. तसेच उर्वरित क्षेत्रात खरिपात मिरची, ज्वारी, कापूस ही पिके असतात. रब्बीत कापसाखील क्षेत्र रिकामे करून त्यात ज्वारी व ज्वारीखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात तीन ते चार एकरात गहू असतो. 

गोठा शेतातच आहे. गोमुत्र संकलन केले जाते. त्यापासून निंबोळी अर्क तयार करतात. याचा व्यवसायही ते गेले सात - आठ वर्षे करीत असून, निंबोळी अर्क व इतर बाबींच्या माध्यमातून ते एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल करतात. शेणापपासून एस९ कल्चर तयार करतात. कृषी विभाग त्याची गरजेनुसार खरेदी करतो. 

आपल्या शेतासाठी पंचगव्य, जीवामृत तयार करतात. फवारणी गोमुत्राद्वारे करतात. तसेच खते म्हणून सेंद्रीय बाबींचा उपयोग करतात. मिरची पूडही ते पारंपरिक पद्धतीने दळून तीची पॅकींग करून विक्री करतात. दरवर्षी सुमारे एक ते दीड क्विंटल मिरची पुडची ४०० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री करतात. 

शेती रसायनमुक्त केल्याने रासायनिक खतांवरील खर्च शून्य आहे. पुणे येथील कंपनीशी त्यांनी धान्य विक्रीसंबंधी करार केला आहे. या कंपनीतर्फे त्यांच्या शेतात पाहणी केली जाते. खात्री झाल्यानंतर खरेदी केली जाते. बाजारातील दरांच्या तुलनेत ज्वारी, गव्हाला २५ टक्के अधिक दर मिळतो. देशी गो संगोपनासंबंधी खिल्लार वळूही त्यांनी आणला होता. यामुळे गायींची संख्या मध्यंतरी ४० पर्यंत पोचली होती. तसेच चार गीर गायींचेदेखील संगोपन केले होते. परंतु २०१७ व नंतर २०१८ मध्ये दुष्काळी स्थिती होती. चारा, पाण्याची समस्या गंभीर बनली. यामुळे गायीं काही परिचयातील शेतकऱ्यांना त्यांनी संगोपनासाठी दिल्या. सध्या १२ गायींचे संगोपन करीत आहे. दूध उत्पादन फारसे घेत नाही. कुटुंबापुरते व किरकोळ स्वरुपातील विक्रीसाठी दूध उपल्ध होते.  प्रतिक्रिया देशी गायींनी माझी शेती जीवाणू, सेंद्रिय कर्बामुळे समृद्ध झाली आहे. शेतमालासही चांगला उठाव दर मिळतात.  - दिलीप पाटील, शेतकरी, वडने (जि.धुळे)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com