आदिवासी भागात कुक्कुटपालनाचा आधार

Support for poultry in tribal areas in Nashik
Support for poultry in tribal areas in Nashik

नाशिक : इगतपुरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्य सरकारच्या स्वयम् प्रकल्पांतर्गत आदिवासी भागातील बेरोजगार कुटुंब व तरुणांना रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पंचायत समिती पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्यातील १०७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना देशी जातीच्या कोंबडी पिलांचे वाटप करण्यात येत आहे. या भागात कुक्कुटपालनाचा चांगलाच आधार मिळाला आहे.

स्वयम् योजनेतील निवडक १०७ लाभार्थ्यांना प्रति लाभार्थ्यांप्रमाणे ४५ पिलांचे वाटप करण्यात येईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात देशी प्रजातीच्या २० पक्ष्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्यास तीन टप्प्यात एकूण ४५ पक्षी देण्यात येतील. पहिला हप्ता २०, दुसरा हप्ता १५ आणि तिसरा हप्ता १० अशा तीन टप्प्यात एकूण ४५ पक्षी प्रत्येक लाभार्थ्यास मिळतील. 

कोंबड्यांच्या खुरड्यासाठी लाभार्थ्याच्या खात्यात १५०० रुपये थेट जमा होतील. यामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालनासाठी शासनाकडून आदिवासी व अनुसूचित जातीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.  टाकेद गटातील घोडेवाडी, बांबळवादी, शिरवाडी, मालदरा, टाकेद बुद्रुक, धानोशी व सोनोशी अशा सात गावांचा यात समावेश आहे. कोंबड्यांची पिल्ले प्रामुख्याने चार आठवड्यांची झाल्यानंतर त्या भागातील लाभार्थ्यांना कोंबड्यांचे वाटप करण्यात येते. कावेरी, गिरीराज, वनराज, सातपुडा आदी देशी प्रजातीच्या कोंबड्यांच्या पिलांचा यामध्ये समावेश होतो.

ज्येष्ठ ग्रामस्थ रतन बांबळे, सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सतीष बांबळे आदींसह डॉ. मदन परदेशी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे, वरणोपचारक पी. एल. टोचे आदी उपस्थित होते.

रोजगारासह अर्थकारणाला चालना 

अंडी तयार झाल्यावर त्याच्यातून स्वयंरोजगार उपलब्ध होईल. त्या कोंबडीपासून उत्पन्न म्हणून निर्माण होणारी अंडी या अंगणवाडी किंवा मार्केटमध्ये दररोज विक्रीस घेतली जातील. यामुळे ग्रामीण भागातील अर्थक्रांतीला व विकासाला चालना मिळेल.

उपक्रमाचा प्रमुख उद्देश...

  • आदिवासी मुलांना कुपोषणमुक्त करणे
  • कुक्कुटपालनातून स्वयंरोजगारीची निर्मिती
  • कुक्कुटपालन संगोपनाची आवड निर्माण करणे
  • अंडी उत्पादनानंतर विक्री व्यवसाय उभा करणे   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com