agriculture news in Marathi support for research of weather resistant variety trough agreement Maharashtra | Agrowon

हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार गती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन देणाऱ्या पिकांचे वाण विकसित करण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था यांच्यामध्ये संशोधनात्मक सामंजस्य करार करण्यात आला.

परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन देणाऱ्या पिकांचे वाण विकसित करण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था यांच्यामध्ये संशोधनात्मक सामंजस्य करार करण्यात आला.

कृषी संशोधन व पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी संशोधन कार्य वृद्धिंगत व्हावे, यासाठी बारामती येथे शुक्रवारी (ता. १७) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या वेळी डॉ. ढवण यांनी बदलत्‍या हवामान परिस्थिती शाश्‍वत उत्‍पादन देणाऱ्या विविध पिकांचे वाण विकास करणे आवश्‍यक झाले असून, या सामंजस्‍य करारामुळे या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाने संशोधन कार्यास गती प्राप्‍त होईल. या संस्‍थेतील शास्त्रज्ञांनी परभणी कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर तसेच आचार्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्‍यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केली जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे या क्षेत्रातील ज्ञान वृद्धिं‍गत होण्‍यास मदत होईल.

बारामती येथील शास्त्रज्ञांनी विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या काही विषयांच्या तासिका घेऊन विद्यार्थ्‍यांना ज्ञानार्जन करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. डॉ. वासकर यांनी कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्याची माहिती दिली. डॉ. राणे म्हणाले, या सामंजस्य करारामुळे ताण सहन करणाऱ्या विविध पिकांचे वाण विकसित होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.

कार्यक्रमास संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके आदींसह राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे शास्त्रज्ञ, विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

दर्जात्मक कृषी संशोधनास चालना
हा सामंजस्य करार पुढील ५ वर्षे कालावधीसाठी आहे. यामुळे नवीन कृषी संशोधनास मिळेल. दर्जात्‍मक संशोधन कार्यास मदत होणार आहे. बदलत्‍या हवामानात कमी व अधिक तापमान, पाण्‍याचा ताण सहन करण्‍याच्‍या दृष्‍टीने कापूस, सोयाबीन, कडधान्य (तूर, हरभरा, मूग आणि उडीद), गळीतधान्य (सूर्यफूल, भुईमूग व जवस), ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या वाणांचे विविध प्रकारच्या चाचण्या व अभ्यास राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत करण्यात येतील. परभणी कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत संशोधन कार्य करू शकतील. या करारामुळे दोन्ही संस्‍था मार्फत भविष्यात नवोन्मेषी संशोधन प्रकल्प आर्थिक साहाय्यासाठी केंद्र शासनास सादर करण्यात येतील. त्याद्वारे उच्च प्रतीचे तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होईल. सध्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेत मोठ्या प्रमाणात संशोधन सहयोगी व वरिष्ठ संशोधन सहायक या पदावर परभणी कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर तसेच आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत, ही विशेष बाब आहे. 


इतर ताज्या घडामोडी
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...
मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका...मुंबई : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी...
परभणीत काकडी ५०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
हरितगृह : बारमाही उत्पन्नाचा आकर्षक...पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेपासून केवळ २० किमी...