बचत गट चळवळ बनली गावासाठी आधार

बचत गट चळवळ बनली गावासाठी आधार
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधार

नागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे (ता. सातारा) या दुर्गम भागातील गावाने बचत गटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ शंभर रुपयांवर सुरू झालेल्या इथल्या बचत गटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे.

रेवंडे हे सातारा तालुक्यातील गाव. डोंगर उंचावरील या गावापुढे कित्येक प्रश्न उभे ठाकलेले. वाढते पर्जन्यमान, दळणवळणाच्या समस्या, उदरनिर्वाहाचे खात्रीशीर साधन नाही. गावातील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबईला वास्तव्यास असतात. भात हे मुख्य पीक. अर्थात तेही पाऊसमानावर अवलंबून. अशात २०१० मध्ये गावात शेतकरी स्वंयसाह्यता बचत गटाची स्थापना झाली. केवळ शंभर रुपये मासिक बचतीवर या गटाची सुरवात झाली. २०१३ मध्ये बचत गटातर्फे फळबाग लागवड करण्यात आली. गटातील सदस्यांना आंबा, फणस, लिंबू या झाडांचे वाटप करण्यात आले. त्यातून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

२०१७ मध्ये बचत गटामार्फत रेशनिंग धान्य दुकान सुरू करण्यात आले. त्यामुळे एरवी होणारी ग्रामस्थांची मोठी पायपीट थांबली. आता या बचत गटाने एक कोटी रुपयांचा समूह शेतीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाच्या सहकार्याने हाती घेतला आहे. त्या दृष्टीने शेतीसाठी आवश्यक ठरणाऱ्या वीस लाख रुपयांच्या अवजारांची खरेदी नुकतीच करण्यात आली आहे. त्यात ग्रास कटर, वूड कटर, चिखलणी यंत्र, पावर विडर, पावर टिलर, फणपाळी, विविध प्रकारचे नांगर, स्वयंचलित पेरणी यंत्र, रोटर, भातमळणी यंत्र, मल्टिक्राप मळणी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली आदी अवजारे खरेदी करण्यात आली आहेत. त्यांचा लाभ केवळ गावापुरता मर्यादित न राहता परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार आहे.

अवजार बँकेनंतर बचत गटामार्फत लवकरच राईस मिल, पोहा मेकिंग मिल, शेततळी, विहीर तसेच सुगंधी औषधी वनस्पती व तेलनिर्मिती हे लघुउद्योग हाती घेण्यात येणार आहेत. - प्रमोद भोसले, रेवंडे (ता. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com