agriculture news in marathi Supreme court ask Central to submit National plan on Covid relief | Agrowon

राष्ट्रीय आराखडा सादर करा; कोरोनास्थितीवरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट अधिक तीव्र झाली असताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आराखडा आमच्यासमोर सादर करण्याचे निर्देश दिले.

नवी दिल्ली  : देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट अधिक तीव्र झाली असताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आराखडा आमच्यासमोर सादर करा. त्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी आवश्‍यक औषधांचा पुरवठ्याबाबतचे देखील नियोजन असायला हवे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. 

सध्या देशभर निर्माण झालेल्या गंभीर स्थितीची न्यायालयाने गुरुवारी (ता. २२) स्वतःहून दखल घेतली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. देशातील लसीकरण नेमके कशा पद्धतीने केले जात आहे, त्यावर देखील आम्ही विचार करू, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या संकटाच्या काळामध्ये विविध उच्च न्यायालयांना लॉकडाउन जाहीर करण्यासाठी बहाल करण्यात आलेले न्यायीक अधिकार आणि त्याच्या पैलूंचा देखील आम्ही अभ्यास करू असे न्यायालयाने म्हटले आहे. सध्या देशभरातील किमान सहा न्यायालयासमोर कोरोनाशी संबंधित विविध समस्यांबाबत सुनावणी सुरू आहे. वेगवेगळ्या प्राधान्यक्रमांवर आधारित येथे सुनावणी होत असल्याने काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. 

या प्रकरणातील सुनावणीसाठी न्यायालयाने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती केली असून ते यामध्ये कायदेशीर आघाडीवर न्यायालयास मदत करतील. याप्रकरणी खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून आता याबाबत पुन्हा शुक्रवारी सुनावणी होईल. न्यायालय या नात्याने आम्ही काही बाबींची स्वतःहून दखल घेऊ असेही खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. 

सध्या देशातील सहा उच्च न्यायालयांमध्ये कोरोनाशी संबंधित मुद्यांवर चर्चा होते आहे, यामध्ये दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्यप्रदेश, कोलकता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयांचा समावेश होतो. यामध्ये काही घटकांसाठी प्राधान्यक्रम निश्‍चित करताना न्यायालयाचा देखील गोंधळ होताना दिसतो.त्यामुळे काही निश्‍चित गोष्टींबाबत स्पष्टता असायला हवी, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने यासाठी चार मुद्द्यांबाबत केंद्र सरकाराला राष्ट्रीय आराखडा सादर करण्यास सांगितले असून त्यासाठीच नोटीस बजावण्यात आली आहे. 

जनतेच्या न्यायालये आक्रमक 
कोरोना संसर्ग वाढ, वाढती मृत्यू संख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य सुविधा अशी गंभीर परिस्थिती असतानाही त्यात फारसा बदल होताना दिसत नाही. या अपुऱ्या पडणाऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांचे जीव जाण्याच्या गंभीर घटना घडत असतानाही आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरूच आहे. या सगळ्यांत हतबल झालेल्या जनतेच्या बाजूने न्यायालयाने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारांच्या कार्यपद्धतीवर आणि संवेदनाहीनतेवर ताशेरे ओढले आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने स्वत:हून पुढाकार घेत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देत सरकारचे कान टोचले आहेत. 

याबाबत आराखडा द्या 

  •   ऑक्सिजनचा पुरवठा 
  •   अत्यावश्‍यक औषधांचा पुरवठा 
  •   लसीकरणाची पद्धत 
  •   लॉकडाउनबाबतचे राज्ये, 
  •   उच्च न्यायालयांचे अधिकार 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...