देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा हक्क नाही...

देवसंस्थानच्या मालकीच्या जमिनींवर वहिवाटदारांना त्यावर हक्क सांगता येणार नाही किंवा परस्पर विक्री करता येणार नाही. देवालये, देवस्थाने किंवा देवसंस्थानची सेवा करत नसलेल्या वहिवाटदारांकडून ही जमीन काढून घेता येईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा हक्क नाही...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा हक्क नाही...

जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या जमिनींवर वहिवाटदारांना त्यावर हक्क सांगता येणार नाही किंवा परस्पर विक्री करता येणार नाही. देवालये, देवस्थाने किंवा देवसंस्थानची सेवा करत नसलेल्या वहिवाटदारांकडून ही जमीन काढून घेता येईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राजे-महाराजे, सरदार-इनामदार घराण्यांनी देवाच्या नावाने इनाम, सनद म्हणून ज्या जमिनी देवसंस्थाने, मंदिरांचे व्यवस्थापन, दिवाबत्ती, पूजा, नैवेध व धार्मिक विधी, उत्सवांसाठी ज्या मानकरी व सेवेकरी यांना दिल्या होत्या. यापैकी जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे काही गावांमध्ये जमिनी असल्याची माहिती देवसंस्थान समितीला मिळाली होती. त्यातील काही जमिनींवर वहिवाटदारांचा ताबा होता.  याबाबत जेजुरी देवसंस्थानचे विश्‍वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले, की श्री खंडोबा देव, मार्तंड देव, मल्हारी देव, खंडेराव देव या नावे सुमारे ११३ एकर जमीन देवसंस्थानची आहे. यापैकी सणसर, सांगवी आणि पिसर्वे येथील जमिनी वगळता इतर जमिनींबाबत कोणतेही कागदपत्र अथवा माहिती देवसंस्थानकडे उपलब्ध नव्हती, परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर करीत इतरत्र असलेल्या जमिनींचा शोध लागला.  यानंतर सनद नाम्यासह सर्व कागदपत्रे मिळवत स्वतंत्र शेती विभाग करण्यात आला. तसेच सहधर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात परिशिष्ठ १ मध्ये नोंदीसाठी सर्व प्रकरणे पाठवण्यात आली आहेत. जमिनींची सरकारी मोजणी करण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीचा अर्ज करण्यात आला असल्याचे श्री. झगडे यांनी सांगितले. मात्र पुढील कायदेशीर प्रक्रिया धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाकडून राबविण्यात येणार असल्याचे विश्‍वस्त श्री. झगडे यांनी सांगितले.   ...येथे आहेत जमिनी सर्व कागदपत्रे शोधण्यात आली, त्यानुसार सणसर (ता. इंदापूर) येथे २२ एकर, तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे १४ एकर, सांगवी (ता. फलटण) येथे २३ एकर, गिरवी (ता. फलटण) येथे १२ एकर, सातारा येथे १३ एकर, लिंब (ता. सातारा) येथे ३ एकर, चाकण (ता. खेड) येथे ११ एकर, पिसर्वे (ता. पुरंदर) येथे १४ एकर आदी सुमारे ११३ एकर क्षेत्र जेजुरी देवसंस्थानच्या मालकीची आहे. गिरवी व सांगवी (ता. फलटण) येथील जमिनीची परस्पर खरेदी-विक्री झाली आहे. तर काही जमिनींच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. जे शेतकरी या जमिनी कसत आहेत, त्यांनी कधीही देवसंस्थांनशी संपर्क केला नाही अथवा कोणत्याही स्वरूपात उत्पन्न दिलेले नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com