agriculture news in marathi Supreme court decision on Jejuri Devasthan | Page 4 ||| Agrowon

देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा हक्क नाही...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 सप्टेंबर 2021

देवसंस्थानच्या मालकीच्या जमिनींवर वहिवाटदारांना त्यावर हक्क सांगता येणार नाही किंवा परस्पर विक्री करता येणार नाही. देवालये, देवस्थाने किंवा देवसंस्थानची सेवा करत नसलेल्या वहिवाटदारांकडून ही जमीन काढून घेता येईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या जमिनींवर वहिवाटदारांना त्यावर हक्क सांगता येणार नाही किंवा परस्पर विक्री करता येणार नाही. देवालये, देवस्थाने किंवा देवसंस्थानची सेवा करत नसलेल्या वहिवाटदारांकडून ही जमीन काढून घेता येईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

राजे-महाराजे, सरदार-इनामदार घराण्यांनी देवाच्या नावाने इनाम, सनद म्हणून ज्या जमिनी देवसंस्थाने, मंदिरांचे व्यवस्थापन, दिवाबत्ती, पूजा, नैवेध व धार्मिक विधी, उत्सवांसाठी ज्या मानकरी व सेवेकरी यांना दिल्या होत्या. यापैकी जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे काही गावांमध्ये जमिनी असल्याची माहिती देवसंस्थान समितीला मिळाली होती. त्यातील काही जमिनींवर वहिवाटदारांचा ताबा होता. 

याबाबत जेजुरी देवसंस्थानचे विश्‍वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले, की श्री खंडोबा देव, मार्तंड देव, मल्हारी देव, खंडेराव देव या नावे सुमारे ११३ एकर जमीन देवसंस्थानची आहे. यापैकी सणसर, सांगवी आणि पिसर्वे येथील जमिनी वगळता इतर जमिनींबाबत कोणतेही कागदपत्र अथवा माहिती देवसंस्थानकडे उपलब्ध नव्हती, परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर करीत इतरत्र असलेल्या जमिनींचा शोध लागला. 

यानंतर सनद नाम्यासह सर्व कागदपत्रे मिळवत स्वतंत्र शेती विभाग करण्यात आला. तसेच सहधर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात परिशिष्ठ १ मध्ये नोंदीसाठी सर्व प्रकरणे पाठवण्यात आली आहेत. जमिनींची सरकारी मोजणी करण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीचा अर्ज करण्यात आला असल्याचे श्री. झगडे यांनी सांगितले. मात्र पुढील कायदेशीर प्रक्रिया धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाकडून राबविण्यात येणार असल्याचे विश्‍वस्त श्री. झगडे यांनी सांगितले.

  ...येथे आहेत जमिनी
सर्व कागदपत्रे शोधण्यात आली, त्यानुसार सणसर (ता. इंदापूर) येथे २२ एकर, तरंगवाडी (ता. इंदापूर) येथे १४ एकर, सांगवी (ता. फलटण) येथे २३ एकर, गिरवी (ता. फलटण) येथे १२ एकर, सातारा येथे १३ एकर, लिंब (ता. सातारा) येथे ३ एकर, चाकण (ता. खेड) येथे ११ एकर, पिसर्वे (ता. पुरंदर) येथे १४ एकर आदी सुमारे ११३ एकर क्षेत्र जेजुरी देवसंस्थानच्या मालकीची आहे. गिरवी व सांगवी (ता. फलटण) येथील जमिनीची परस्पर खरेदी-विक्री झाली आहे. तर काही जमिनींच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आहेत. जे शेतकरी या जमिनी कसत आहेत, त्यांनी कधीही देवसंस्थांनशी संपर्क केला नाही अथवा कोणत्याही स्वरूपात उत्पन्न दिलेले नाही. 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...
नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना...नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या...सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या...
सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी...यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य...
अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे......सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही...
विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले,...
जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा खडसेंचा...जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या...जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा...
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरसोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला...सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या...
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने...नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना...
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसेअकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा...
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत...रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार...
देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या...नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत...
ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची...नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी...