भंडारा जिल्ह्यात सर्वेक्षणात नुकसान क्षेत्र घटवले

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका बसत पन्नास हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रशासकीय सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या आकडेवारीत मात्र अवघ्या २७ हजार हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान दर्शविण्यात आले आहे.
The survey in Bhandara district reduced the damage area
The survey in Bhandara district reduced the damage area

भंडारा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका बसत पन्नास हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रशासकीय सर्वेक्षणाअंती समोर आलेल्या आकडेवारीत मात्र अवघ्या २७ हजार हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान दर्शविण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यात पुराचे पाणी शिरल्याने नदीकाठावरील अनेक गावांमध्ये जमीन खरडून गेली होती. अनेक शिवारात केवळ वाळूचे थर शिल्लक उरले होते. ज्या भागात पुराचा फटका बसला नाही त्या भागातील पिके आता परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३७८ गावातील शिवारात धानासह अन्य पिकांचे नुकसान झाले.

भात, भाजीपाला, सोयाबीन, कापूस, तूर ही पिके प्रभावित झाली. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भंडारा तालुक्यात  ५४६०, तुमसर तालुक्यात ३८७८, पवनी तालुक्यात ८१३८, साकोली तालुक्यात २००,  लाखनी ७८ तर लाखांदूर तालुक्यात ४५७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले क्षेत्र ७०५२ हेक्‍टर इतके असून ते ३३ टक्‍क्‍यांच्या वर २१७९५ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे अहवालात म्हटले आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला. या शेतकऱ्यांना शासकीय निकषानुसार मदत केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय प्रभावित गावांची संख्या
भंडारा ९९
मोहाडी ३५
तुमसर ३६
लाखणी १७
लाखांदूर ३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com