सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण

सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील गावठाणांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण

सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा ड्रोनद्वारे सर्व्हे होईल. घरे, रस्ते, शाळा, अंगणवाडीसह सर्व खासगी व शासकीय मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येईल. मालमत्ताधारकांना वर्षभरात प्रॉपर्टी कार्ड मिळेल. ३९९ गावठाणांची हद्दही निश्‍चित केली जाणार आहे. हे सर्वेक्षण ऑगस्टमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आटपाडी तालुक्‍यातील ५१ गावांत होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. 

गावठाणांच्या सर्व्हेसंदर्भात जमाबंदी आयुक्‍त एस. चोकलिंगम व ग्रामविकासचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. 

जिल्ह्यात ७२८ गावे आहेत. यापैकी २६० गावांत नगर भूमापन झाले आहे. गावठाण हद्द निश्‍चित झालेली गावे ६९ आहेत. नगर भूमापन न झालेली गावे ४६८ आहेत. गावठाण हद्द निश्‍चित करणे शिल्लक असलेली गावे ३९९ आहेत. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत ६९ गावांत गावठाण हद्द निश्‍चित होणार आहे. ४६८ गावांत ग्रामविकास अधिकारी, तलाठी व सर्वेअरतर्फे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होईल.

प्रॉपर्टी कार्डच्या आधारे कर्ज, अन्य बाबी सुलभ होतील. कर आकारणीतही पारदर्शकता येईल. गावठाणाबाहेर पंधरापेक्षा जास्त घरे असलेल्या वस्तीवरही ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येईल. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही. घरपट्टी आकारणीसाठी याचा लाभ होणार आहे, असेही गावडे यांनी सांगितले. 

तालुका गावे
मिरज  १७
तासगाव ३९
पलूस  १५
खानापूर  ५०  
कडेगाव ३६
आटपाडी ५१  
जत  ९८
कवठेमहांकाळ ४०
वाळवा ४७
शिराळा ७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com