Agriculture news in marathi survey on damaged Soybean in Khandesh | Agrowon

खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही सर्वेक्षण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या पंधरवड्यात पंचनामे हाती घेण्यात आले. मध्यंतरी पाऊस सुरूच होता. यात सोयाबीन पकासंबंधीदेखील पंचनाम्यांची मागणी करण्यात येत होती. यामुळे सोयाबीनबाबतही सर्वेक्षण सुरू झाले आहे.

जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या पंधरवड्यात पंचनामे हाती घेण्यात आले. मध्यंतरी पाऊस सुरूच होता. यात सोयाबीन पकासंबंधीदेखील पंचनाम्यांची मागणी करण्यात येत होती. यामुळे सोयाबीनबाबतही सर्वेक्षण सुरू झाले आहे.

खानदेशात मुगाचे ७५ टक्क्यांवर, तर उडदाचे सुमारे ६५ टक्के नुकसान झाले आहे. ही नुकसानीची पातळी गेल्या आठवड्यातील पावसाने वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक माहिती गेल्या आठवड्यातही जारी झाली होती. पुन्हा याबाबत नवी माहिती दिली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ हजार हेक्टरवर मुगाचे ७५ टक्के आणि उडदाचे सुमारे १५ हजार हेक्टरवर सुमारे ६५ टक्के नुकसान झाले आहे. धुळ्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर उडदाचे आणि मुगाचेदेखील १० हजार हेक्टरवर ८० टक्के,  नंदुरबारात सुमारे आठ हजार हेक्टरवर मुगाचे ७८ टक्के, तर उडदाचे चार हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. काही भागात उडदाच्या नुकसानीची पातळी अधिक आहे. कारण, या भागात अधिक पाऊस होता.

सातपुडा पर्वतालगत मुगाची हानी अधिक झाली आहे. नुकसानीसंबंधी अंतिम माहिती तयार झालेली नाही. कारण उडदाचे पीक अनेक भागात उभे आहे. त्यात नुकसान होत आहे. कारण पाऊस सतत सुरू आहे. काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस येत आहे. यामुळे मळणीवर परिणाम होत असून, पीक शेतातच पडून राहत आहे. उडदात दाणे पिवळे, लाल पडण्याचे प्रकार आर्द्रता व पावसुामुळे होत आहेत, अशी माहिती मिळाली.

सोयाबीनचे ६५ टक्के नुकसान

सोयाबीनचेदेखील अतिपावसात ६० ते ६५ टक्के एवढे नुकसान काही भागात झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. परंतु, याबाबत पंचनामे सुरू नव्हते. शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाकडे  वारंवार मागणी केली. यानंतर सोयाबीनची स्थिती काय आहे, याचे सर्वेक्षण केले जात आहे. पाऊस लांबत असल्याने हे पिकही संकटात आहे. पंचनाम्यांची गरज आहे.  


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...