न्याहलीच्या पाणीयोजनेची अभ्यास गटातर्फे पाहणी

न्याहलीच्या पाणीयोजनेची अभ्यास गटातर्फे पाहणी
न्याहलीच्या पाणीयोजनेची अभ्यास गटातर्फे पाहणी

नंदुरबार   : ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध, नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी राज्यात लवकरच ‘जल जीवन मिशन’ सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर न्याहली (ता. नंदुरबार) येथील नळपाणीपुरवठा योजना, गाव व परिसरातील स्वच्छता याच्या अभ्यासासाठी युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषद व प्रायमूव्ह संस्थेतर्फे अभ्यास गटाने नुकतीच पाहणी केली. पाणीयोजना तयार करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यात यावा यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. या गटाने पाणीयोजना, योजनेचे स्रोत, वितरण व्यवस्था, पाणी हाताळणी व साठवणूक याविषयी प्रत्यक्ष पाहणी करून अभ्यास केला. ग्रामस्थांच्या सहभागातून गाव कृती नकाशा काढून त्याचे वाचन केले. शाळा, वाचनालय, उपकेंद्र, अंगणवाडी या संस्थात्मक भेटी देऊन तेथील स्वच्छता व पाणी याविषयी अभ्यास केला. येथील निरीक्षणे जल जीवन मिशनच्या राज्यस्तरावरील तयार करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.  प्रकल्प व्यवस्थापक सचिन सुपेकर, मंगेश भालेराव, श्रीमती अनुया भिडे, शाखा अभियंता एम. एस. सोनवणे, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे योगेश कोळकर, कैलास कांजरेकर, विशाल परदेशी, नितीन पाटील, तुषार देवरे, प्रीतेश पाटील, अर्जुन कडवे यांचा समावेश होता. सरपंच शालिनी पाटील, माजी सरपंच सदानंद पाटील, उपसरपंच चंदू भील, पंढरीनाथ माळी, अंगणवाडी सेविका रेखाबाई माळी, हिरालाल माळी, ग्रामसेविका एस.  एस. चव्हाण आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com