सुरगाणा तालुक्यात श्रीभुवन, दुमी योजनेचे सर्व्हेक्षण सुरू

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सुरगाण्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते. त्यानुसार या योजनांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे कामाला गती येणार आहे.
Survey of Sribhuvan, Dumi scheme started in Surgana taluka
Survey of Sribhuvan, Dumi scheme started in Surgana taluka

नाशिक : सुरगाणा तालुक्यात एकही मोठी सिंचन योजना नाही. त्यामुळे केवळ २ टक्के सिंचन होते. पाण्याची टंचाई असल्याने उन्हाळ्यात रोजगारासाठी गुजरात राज्यात होणारे तालुक्यातील स्थलांतर रोखण्यासाठी सिंचन प्रकल्पाद्वारे जमीन ओलिताखाली आणणे हा एकमेव पर्याय आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सुरगाण्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचे आश्वासन बैठकीत दिले होते. त्यानुसार या योजनांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे कामाला गती येणार आहे. 

सुरगाणा तालुक्यातील नियोजित दुमी व श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे सर्वेक्षण व प्रकल्प क्षेत्राची  कळवण-सुरगाणा मतदार संघाचे आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी पहाणी करुन लाभ क्षेत्रातील आदिवासी बांधवांशी नुकताच संवाद साधला. कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दुमी व श्रीभुवन प्रकल्पाचा प्रस्ताव शासनस्तरावर तात्काळ सादर करण्याच्या सूचना संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

नाशिक येथे मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रास्तवित सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती. पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे व पवार यांच्यासमवेत सुरगाणा तालुक्यातील दुमी व श्रीभुवन योजनाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची पहाणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश बैठकीत दिले होते. 

पाच हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार 

दुमी प्रकल्प हा नदीवर आहे. साठवण क्षमता १७०० द.ल.घ.फु. आहे. दोन कालव्या अंतर्गत सुरगाणा, पेठ व दिंडोरी या तालुक्यातील ३५ गावांचे ५००० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा सविस्तर अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी कोकण महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात आला, असे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com