Agriculture news in marathi, A survey by the World Bank's team on 'krushi Sanjivani' works | Page 2 ||| Agrowon

‘कृषी संजीवनी’तील कामांची जागतिक बॅंकेच्या पथकाकडून पाहणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत कामांची जागतिक बँकेच्या पथकाने रविवारी (ता. २२) कामठा येथे भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. 

नांदेड : कामठा बुद्रुक (ता. अर्धापूर) येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत कामांची जागतिक बँकेच्या पथकाने रविवारी (ता. २२) कामठा येथे भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. 

या प्रकल्पातंर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरून आयोजित केलेल्या शेतीशाळेची माहिती या वेळी त्यांना देण्यात आली. त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानात हवामान अनुकूल वाणांचा वापर, समतल मशागत, रुंद सरी वरंबा पद्धतीवर सोयाबीन लागवड, आंतरपीक पद्धती आदीबाबत या पथकाने चर्चा केली. प्रकल्पातील वैयक्तिक बाब राबविण्यासाठी घटकांमधील अनुदानाच्या रकमेशिवाय उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्जाऊ सुविधा द्यावी. या गावांमध्ये लाभक्षेत्र असल्यामुळे जलसंधारणाची कामे राबविण्यात अडचणी येतात. त्यामुळे जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करावे, आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तहसीलदार सुजित नरहरे उपस्थित होते. 

हवामान बदलास विविध घटक कारणीभूत आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करून ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करणे गरजेचे आहे, असे या वेळी सांगण्यात आले. कृषी सहाय्यक गजानन पंडागळे, कामठा बुद्रुक येथील ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, शेतकरी उपस्थित होते. कामठा बुद्रुक येथील कृषी सहायक सुनील सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...