agriculture news in marathi Survival of kharif crops in Khandesh | Agrowon

खानदेशात खरीप पिकांना जीवदान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

जळगाव ः  खानदेशात सोमवारी (ता. १९) सायंकाळी व रात्री अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. अनेक दिवसानंतर चांगला पाऊस झाल्याने बळीराजासह दुबार पेरणीच्या पिकांनाही जीवदान मिळाले. 

जळगाव ः  खानदेशात सोमवारी (ता. १९) सायंकाळी व रात्री अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. अनेक दिवसानंतर चांगला पाऊस झाल्याने बळीराजासह दुबार पेरणीच्या पिकांनाही जीवदान मिळाले. 

खानदेशात सुमारे १० ते १३ हजार हेक्टरवरील पिके पावसाअभावी होरपळल्याने मोडावी लागली होती. जळगाव जिल्ह्यात जळगाव, यावल, चोपडा, धुळ्यातील शिंदखेडा,  नंदुरबारमधील शहादा, नवापूर, नंदुरबार भागात पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत होते. या भागात दुबार पेरणी अनेकांनी १२ जुलैनंतर केली होती. पण त्यावर समाधानकारक पाऊस नव्हता. सोमवारी सायंकाळी पाऊस आला. त्यामुळे या पेरणीसह इतर पिकांना लाभ होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सोमवारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर आदी भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. अनेक महसूल मंडळांमध्ये ४५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस सोमवारी झाला. या पावसाने जुलैमधील पावसाची टक्केवारीदेखील वाढणार आहे. 

२४ तासांतील पाऊस (मि.मी) ः जळगाव ः जळगाव २७, चोपडा २९, यावल ३१, भुसावळ १९. धुळे ः शिंदखेडा २४, साक्री ३२. नंदुरबार ः अक्कलकुवा ३८, शहादा २४.

 नदी, नाल्यांना पाणी

धुळ्यातही शिंदखेडा, धुळे, साक्री, शिरपुरात पाऊस झाला. सातपुड्यातील पाड्यांवर भागातील नदी, नाल्यांना प्रवाही पाणी आले. शिरपुरातील अनेर धरणातील साठाही वाढण्यास सुरवात झाली. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार तालुक्यांतही मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जोरदार पाऊस काही वेळ झाला. नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रात्रीदेखील हलका पाऊस काही भागात सुरूच होता. या पावसामुळे खानदेशातील केळी, ऊस, कापूस, भाजीपाला आदी पिकांचे सिंचन करण्याची समस्यादेखील दूर झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...