Agriculture news in marathi Survive the sweetness of hapus rate | Agrowon

हापूसचा दराचा गोडवा टिकून 

राजेश कळंबटे
सोमवार, 19 एप्रिल 2021

वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा कोकणच्या हापूसवर झाला आहे. उत्पादन घट झाली असून, या वर्षी सरासरी उत्पादन ३० टक्केच आहे. त्यामुळे आज (रविवारी) वाशी मार्केटमध्ये १५०० ते ४००० रुपये प्रतिपेटी दर मिळत आहे.

रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा कोकणच्या हापूसवर झाला आहे. उत्पादन घट झाली असून, या वर्षी सरासरी उत्पादन ३० टक्केच आहे. त्यामुळे आज (रविवारी) वाशी मार्केटमध्ये १५०० ते ४००० रुपये प्रतिपेटी दर मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये यंदा पाचशे रुपये पेटीमागे चढे दर आहे; मात्र टाळेबंदीचे धोरण पुन्हा एकदा आंबा व्यावसायिकांपुढे आव्हानात्मक ठरणार आहे. 

यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावली. पुरेश थंडी न पडल्यामुळे पालवी आलेल्या झाडांना मोहोरच आला नाही. या परिस्थितीला सामना करत असतानाच डिसेंबर, फेब्रुवारीत अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचा सामना करावा लागला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक फवारण्यांवर खर्चही करावा लागला आहे. मार्च महिन्यात येणारे हापूसचे उत्पादन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुलनेत पाच ते दहा टक्केच आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आलेल्या उष्णतेच्या वादळामुळे फळगळ आणि हापूसमधील साका वाढीचे प्रमाण अधिक होते. त्याचा दर्जावरही परिणाम झाला होता. 

हवामानातील बदलांचा सामना करत बागायतदारांच्या हाती कमी उत्पादन लागले आहे. दर्जेदार आंब्याला चांगला दर मिळत आहे. याच कालावधीत आखाती देशांसह युरोपमध्येही निर्यात सुरू झाल्याने आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या फळ बाजारात दररोज १८ ते २० हजार पेटी वाशी मार्केटमध्ये जात आहेत. फक्त गुढीपाडव्याला मुहूर्ताच्या दिवशी ३४ हजार ही सर्वाधिक पेटी गेली. त्यानंतर पुन्हा आंबा पेटी जाण्याचे प्रमाण घसरले आहे. 

एप्रिल महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून सरासरी ६० हजार पेटी जाते. त्याचा फायदा दरावर झाला आहे. पाच डझनच्या पेटीचा दर मुंबईत पाचशे रुपयांनी वधारला आहे. स्थानिक बाजारातील मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे दर वधारलेले आहेत. त्यामुळे निर्यातही कमी झाली आहे. पहिल्या टप्प्यात उत्पादनाचा बहर ओसरला असून, दुसऱ्‍या टप्प्यातील आंबा २० एप्रिलनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या हापूसची आवक घटली आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत दर चढेच राहील, असा बागायतदार अंदाज व्यक्त करत आहेत. 

आतापर्यंतच्या इतिहासात एवढा दर केव्हाच मिळाला नसल्याच्या प्रतिक्रिया बागायतदार व्यक्त करत आहेत. यंदा उत्पादन कमी असले तरी दर अधिक आहेत; मात्र अखेरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनही कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत कडक लॉकडाउन झाला, तर त्याचा परिणाम कोकणातून वाशीसह विविध बाजारांत जाणाऱ्‍या आंबा वाहतुकीवर होऊ शकतो. तसेच ग्राहकच नसल्यामुळे दरही घसरू शकतात. गतवर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तसे झाले तर पुन्हा आंबा काढणीसाठी बाहेर पडणाऱ्‍या कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्‍न येतो. गतवर्षी काही बागायतदारांनी आंबाच झाडावरून काढला नव्हता. पडून वाया गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

दरम्यान, काही बागायतदारांनी याचा फायदा घेऊन घरोघरी थेट हापूस विक्रीचा फंडा राबवला होता. कोरोनाच्या इष्टापत्तीचा फायदा काही बागायतदार सकारात्मकतेने उचलत आहेत. त्यामुळे वाशीतील बाजारात जाणाऱ्‍या एकूण मालावर परिणाम झाल्याचे तेथील व्यावसायिक कबूल करतात. सुमारे वीस टक्के माल मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य जिल्ह्यांत जात आहे. अनेक परजिल्ह्यांतील व्यावसायिक थेट कोकणात येऊन बागायतदारांच्या घरी जाऊन आंबा खरेदी करत आहेत. 

हापूसचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
रत्नागिरी ६५ हजार
सिंधुदुर्ग  ३० हजार २४०

या वर्षी हंगामात २० ते २५ टक्केच उत्पादन राहील. त्यामुळे दर टिकून राहतील. बागायतदारांना हा हंगाम सर्वांत वाईट जाणार आहे. दरवर्षी पाडव्याला १ लाख पेटी जाते. यंदा ती अवघी ३५ हजार आहे. 
- डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष कोकण आंबा उत्पादक प्रक्रिया संघ 

हंगामाच्या तोंडावर पडलेल्या पावसामुळे आंबा डागी झाला आहे. चांगल्या फळाला दर आहे. मात्र टाळेबंदी कडक झाली तर वाहतुकीचा प्रश्‍न उद्‍भवू शकतो. 
- सचिन दाभोळकर, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग 

हापूसची आवक कमी असून, ग्राहकांकडून मागणी वाढलेली आहे. परिणामी, हापूसचे दर तुलनेत अधिक आहेत. त्याचा फायदा नक्कीच बागायतदारांना होऊ शकतो. 
- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती नवी मुंबई 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...