कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षेत सुशांत धनावडे प्रथम

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षेत सुशांत धनावडे प्रथम
कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षेत सुशांत धनावडे प्रथम

पुणे : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत चारही कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षातील प्रवेशासाठी गेल्या महिन्यात १६ ते १८ मार्च या कालावधीत पदव्युत्तर पदवीची परिक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ८) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कृषी विद्याशाखेत सुशांत अण्णासू धनावडे हा ९० टक्के गुण, तर उद्यानविद्या शाखेतील राजश्री सुभाष निंबाळकर ही ७६.५० टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत.   शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये २१ हजार ४३० विद्यार्थ्यापैकी १९ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. मंडळामार्फत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या http://mcaer.org या संकेत स्थळावर सोमवार (ता. ८) पासून निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थी आपले गुणपत्रक संकेत स्थळावरून डाऊनलोड करू शकतात. तसेच, निकालबाबत शंका असल्यास विहीत फी भरून कार्यालयीन सात दिवसांच्या आत निकाल जाहीर झाल्यापासून फेर तपासणीसाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या नियंत्रक विभागात अर्ज करता येईल. परीक्षा मंडळाने यावर्षी प्रवेश परीक्षेची सर्व प्रक्रिया लवकर पार पाडल्याने चालू वर्षी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला जून जुलैमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू करणे शक्य होईल. पदव्युत्तर पदवीच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी कृषी शाखेतील सर्वाधिक ११ हजार ४८३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. उद्यानविद्या शाखेतील ३ हजार २९९, वनशास्त्र शाखेतील ३१८, कृषी अभियांत्रिकी ६५६, अन्नतंत्रज्ञान ३९७, गृहविज्ञान २४, मत्स्यशास्त्र ८८, कृषी जैवतंत्रज्ञान ७७८,  कृषी व्यवसाय व्यवस्थापन दोन हजार २०५, काढणीपश्चात व्यवस्थापन शाखेतील ४६९ विद्यार्थ्यी परीक्षेस बसले होते. यात वनशास्त्र शाखेतील शशिकांत रामचंद्र सानप हा ८४.०० टक्के, कृषी अभियांत्रिकीतील अभिजित राजेंद्र जाधव ७६.०० टक्के, अन्नतंत्रज्ञान मोलकटटला जगदेश्वर रेड्डी ७६.५० टक्के, गृहविज्ञान शरवरी माधव ढोले ७५.५० टक्के, मत्स्यशास्त्र शमईका शांताराम सावंत ७८.५० टक्के, कृषी जैवतंत्रज्ञान बाळ सामंत सनजिब सीतानाथ ८९.००, कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेतील जे. नव्या जोशेप कुरियन ६९.०५ टक्के गुण मिळवून प्रथम आले आहेत, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com