agriculture news in marathi, Sushma Swaraj Passes away | Agrowon

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन

वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : माजी केंद्रियमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) येथे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते. 

नवी दिल्ली : माजी केंद्रियमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) येथे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते. 

सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील असलेल्या स्वराज या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. २०१४ ते २०१९ पर्यंत त्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या. स्वराज या संसदेचे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून होत्या. दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्रीही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४ लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या होत्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नल यांनी स्वराज यांना भारताच्या 'आवडत्या राजकारणी' म्हणून संबोधले होते. 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...