agriculture news in Marathi, Suspend those who are in the not working drought | Agrowon

दुष्काळात निर्धास्त असलेल्यांना निलंबित करू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 मे 2019

जत, जि. सांगली ः दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. असे असतानासुद्धा प्रशासनातील कर्मचाऱ्यांना सोयरसुतक नाही. सारे आलबेल असल्यागत सुरू आहे, अशा कामचुकारांना निलंबित करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला. 

जत, जि. सांगली ः दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. असे असतानासुद्धा प्रशासनातील कर्मचाऱ्यांना सोयरसुतक नाही. सारे आलबेल असल्यागत सुरू आहे, अशा कामचुकारांना निलंबित करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला. 

डॉ. चौधरी यांनी सोमवारी (ता. २९) जतला भेट देत दुष्काळाचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी प्रथम सर्व शासकीय अधिकारी, खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लोकप्रतिनिधींची मते, मागणी व दुष्काळाची परिस्थिती जाणून घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, जतचे तहसीलदार सचिन पाटील, संखचे अप्पर तहसीलदार राजेंद्र पिसाळ, मुख्याधिकारी अभिजित हराळे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे हे उपस्थित होते. 

दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत आहे. कर्मचाऱ्यांना गांभीर्य नाही. एकही ग्रामसेवक व अन्य अधिकारी लक्ष देत नाही. टॅंकरच्या खेपा पडतात की नाही, पाणीपुरवठा शुद्ध होतो की नाही, टीसीएल टाकले जाते का? हे पाहत नाहीत, हातपंप दुरुस्त केले जात नसल्याबाबत पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, असा इशारा दिला. 

टॅंकरच्या खेपा अनियमित पडत आहेत. जाचक अटीमुळे चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. जाचक अटी कमी कराव्यात. प्रशासनाने पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी श्री. सावंत यांनी केली. 

तालुक्‍यात दुष्काळ भयावह आहे. ८७ गावांत १०३ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू  आहे. २३७ खेपा मंजूर आहेत. प्रत्यक्षात १९७ खेपांनी जतमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. टॅंकर सुरू केले खरे पण नियोजन नाही. प्रत्येक गावात टॅंकरच्या खेपा या अनियमित आहेत. त्यावर प्रशासनाचे लक्षच नसल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.

मागेल तेथे टॅंकर, चारा छावण्या सुरू करा 
तत्पूर्वी, तालुक्‍यात भयावह दुष्काळ असून, प्रशासनाने मागेल तेथे टॅंकर तसेच तालुक्‍यात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, असे साकडे तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले.


इतर ताज्या घडामोडी
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...
अल्पसंख्यांक समाजामुळे सत्ता परिवर्तन ः...मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम...
शंकरराव चव्हाण यांच्या...नांदेड ः नांदेडचे नगराध्यक्ष ते...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
..हे आहेत सुपीकता, उत्पादकतेवर परिणाम...पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...