Agriculture news in marathi; Suspended secretary of the Wasim Samiti's mischief: Ram Shinde | Agrowon

वाशीम समितीच्या गैरव्यवहारप्रकरणी सचिव निलंबित ः राम शिंदे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 जून 2019

मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पणनमंत्री राम शिंदे यांनी काल (ता. २६) विधानसभेत या समितीच्या सचिवाच्या निलंबनाची आणि प्रशासक मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली. 

आमदार सुनील केदार, सुनील देशमुख आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी या बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिंदे यांनी उत्तर दिले. या गैरव्यवहाराची अमरावती विभागीय सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री शिंदे यांनी दिली. 

मुंबई ः  वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी पणनमंत्री राम शिंदे यांनी काल (ता. २६) विधानसभेत या समितीच्या सचिवाच्या निलंबनाची आणि प्रशासक मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली. 

आमदार सुनील केदार, सुनील देशमुख आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी या बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला शिंदे यांनी उत्तर दिले. या गैरव्यवहाराची अमरावती विभागीय सहसंचालक यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री शिंदे यांनी दिली. 

बोर्डी (जि. पालघर) येथील चिकू महोत्सव आयोजकांच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी विधानसभेत दिले. आमदार पास्कल धनारेंनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. इतर संस्था पात्र नसल्याने रुरल इन्ट्रपिनर्स वेलफेअर फाउंडेशनला २४ लाखांचे कंत्राट दिले होते. आत्तापर्यंत ५ लाख रुपये दिले असल्याचेही आदिवासीमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. तसेच आयोजक संस्थेबाबत झालेल्या तक्रारींबाबत आमदारांची बैठक घेऊन त्यानंतरच उर्वरित निधी दिला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ५ टक्के खर्च अपंगासाठी खर्च करण्याबाबत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. गाळेवाटपातही अपंगांना ५ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणीही कडू यांनी केली होती. या संदर्भात बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केली. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...