agriculture news in Marathi suspension of Rahuri agriculture university registrar cancelled Maharashtra | Agrowon

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांच्या निलंबनास स्थगिती 

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाशकुमार पाटील यांनी गेल्या आठवड्यात कुलसचिव मोहन वाघ यांना निलंबित केले होते. मात्र त्यांचे निलंबन रद्द केले आहे. 

नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाशकुमार पाटील यांनी गेल्या आठवड्यात कुलसचिव मोहन वाघ यांना निलंबित केले होते. मात्र त्यांचे निलंबन रद्द केले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाचे अवर सचीव अ. नि. साखरकर यांनी याबाबत १२ मे रोजी आदेश काढले आहेत. याबाबत आता कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक याबाबत चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करणार असून त्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांना मागील आठवड्यात कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी कामात अनियमितता असल्याचे स्पष्ट करत निलंबित केले होते व वाघ यांचा पदभार डॉ. महानंद माने यांच्याकडे दिला होता. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली होती. निलंबनानंतर कुलगुरूंना अधिकार नसताना निलंबन कारवाई केल्याचा आरोप शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी करत निलंबन माघे घेतले नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. वाघ यांनीही चुकीची कारवाई झाल्याचा आरोप करत कृषी सचिवांना याबाबत पत्र लिहले होते. वाघ यांचे निलंबन रद्द केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. बुधवारी (ता.१२) हा आदेश झाल्याचे दिसत आहे. 

काय म्हटले आहे पत्रात? 
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम १४ मधील तरतुदींनुसार वाघ यांना निलंबित करण्याला कुलगुरू हे जरी सक्षम असले, तरी वाघ हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गट-अ (वरिष्ठ) संवर्गातील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे नियुक्ती प्राधिकारी कृषिमंत्री हे आहेत. त्या अनुषंगाने वाघ यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे सादर केलेला खुलासा, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार चौकशीअंती निर्णय घेणे उचित होईल. त्यानुसार कृषी शिक्षण व संशोधन महासंचालक चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करतील व त्यानंतर निर्णय होणार असून, चौकशी होईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (५) (क) चा वापर करून कुलगुरू यांनी काढलेला निलंबनाचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. 


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...