Agriculture News in Marathi Sustainable in the world competition Let's try to import grape varieties | Page 4 ||| Agrowon

जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण आयातीसाठी प्रयत्न करू : डॉ. भारती पवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

नाशिकचे द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रयोगशीलतेने द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यामुळे निर्यातीच्या संधी निर्माण झाल्या. त्यांनी जगाची बाजारपेठ काबीज करावी यासाठी जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण आयात करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. 

पिंपळगाव बसवंत, ता. निफाड : नाशिकचे द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रयोगशीलतेने द्राक्ष उत्पादन घेत आहेत. त्यामुळे निर्यातीच्या संधी निर्माण झाल्या. त्यांनी जगाची बाजारपेठ काबीज करावी यासाठी जागतिक स्पर्धेत टिकणारे द्राक्ष वाण आयात करण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य  द्राक्ष बागायतदार संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे बसवंत प्रतिष्ठान व फ्राटेली फ्रूट्‍स फार्मरतर्फे नुकताच झाला. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे संचालक माणिकराव पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘परदेशी बाजारपेठत स्पर्धक देशांना टक्कर देण्यासाठी नवीन द्राक्ष वाणांची लागवड करणे ही काळाची गरज आहे. रंग व चवीला परिपूर्ण असलेले वाण परदेशातून आयात करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार आहे. किसान रेल उपक्रमाचा सर्वांधिक लाभ नाशिकच्या शेतकऱ्यांना झाला आहे. द्राक्ष, कांद्यासह भाजीपाला मोठ्या प्रमाणात देशभर पोहोचत आहे. द्राक्ष उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असेल. द्राक्ष निर्यातीच्या अनुदान मिळवून देण्यासह द्राक्ष उत्पादकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी लवकरच कृषी, वाणिज्य विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बसवंत प्रतिष्ठानचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा काम करताना उत्साह वाढावा म्हणून सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. पिंपळगावच्या स्वयंवर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास राजेद्र मोगल, यतीन कदम, द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष ॲड. रवींद्र निमसे, सुरेश डोखळे, सुरेश कळमकर, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, अन्नू मोरे आदी उपस्थित होते. 

केंद्राने नियम शिथिल करावेत 
माणिकराव पाटील म्हणाले, ‘‘हवामानानुसार द्राक्ष शेतीत स्थित्यंतर येणे गरजेचे आहे. नवीन वाण परदेशातून आणण्यासाठीचे नियम केंद्र शासनाने शिथिल करावेत, त्यासाठी मंत्री डॉ. पवार यांनी पुढाकार घ्यावा.’’ कैलास भोसले यांनी द्राक्षशेती अस्मानी व सुलतानी संकटात असल्याचे नमूद केले.  


इतर बातम्या
द्राक्ष बागाईतदार संघाने मांडल्या...नाशिक : द्राक्ष निर्यातीबाबत या हंगामात...
रायगड जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतीमध्ये...अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त...
पुणे विभागात रब्बीच्या पेरण्यांना येईना...पुणे : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत...
‘आत्मा’ शेतकरी सल्लागार समित्यांना...नगर ः कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसह ‘...
अनियमित वीजपुरवठ्याने नांदेड जिल्ह्यात...नांदेड : खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा...
खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच  जळगाव ः  खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
ऑक्टोबरमध्ये बाजारात आला ३१.१३ लाख गाठी...पुणे ः कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरू झाल्यानंतर...
जळगाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी  देवकर,...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी...
केव्हीकेतर्फे कीडनियंत्रण सापळ्यांचे...वाशीम : अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे जसे...
कृषिपंपांसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलनभंडारा ः आधारभूत खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांच्या...
नाशिक: बच्चू कडू यांच्याकडून जलसंपदा...नाशिक: राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम सन...
देवीखिंडीच्या शेतकऱ्यांना ‘टेंभू’च्या...लेंगरे, जि. सांगली : टेंभूच्या चौथ्या, पाचव्या...
शेततळ्यांना मिळणार ५२ कोटींचे अनुदानपुणे ः राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या...
राज्यात पावसाची उघडीप शक्य पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली...
 हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ...औरंगाबाद : येथे सी बँड रडार डॉपलर बसविण्यास...
ब्राझीलमध्ये सोयाबीनची ८६ टक्के पेरणी...पुणे ः यंदा पेरणीला पोषक वातावरण असल्याने...
लाटलेला पैसा वसूल करण्याचे आदेशपुणे ः गट शेतीबाबत राज्य शासनाला दिशाभूल करणारी...
सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे...
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...