कारखान्यांवर कारवाईसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

स्वाभिमानी आंदोलन
स्वाभिमानी आंदोलन

कोल्हापूर: जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत कारखान्यावर जप्तीची कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. ३१) अचानक आंदोलन केले.  दुपारी सावकर मादनाइक, जालिंदर पाटील, सागर संभूशेटे, शैलेश चौगुले, आण्णासो चौगुले आदीसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच आंदोलन सुरू केले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरू केली का याबाबत विचारणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचे आदेश अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले नसल्याचे सांगताच संतप्त कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती दिली. अधिकाऱ्यांकडून या आदेशाची प्रत घेऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.  जिल्हाधिकारी कार्यालयात कारवाईच्या आदेशाची प्रत दिली. जिल्हधिकारी कार्यालयाने तातडीने कारवाई सुरू करावी, अशा सूचना साखर आयुक्तालयाने दिलेल्या आहेत. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर थेट कारवाई सुुरू करण्याची मागणी यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास नवव्या दिवशी महामोर्चा काढून जाब विचारला जार्इल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com