सोलापुरात थकीत ऊसबिलासाठी ‘स्वाभिमानी’चा ‘फॅबटेक' स्थळी ठिय्या

Swabhimani agitation front of 'FabTech' for tired sugarcane bills in Solapur
Swabhimani agitation front of 'FabTech' for tired sugarcane bills in Solapur

मरवडे, जि. सोलापूर : नंदूर (ता. मंगळवेढा) येथील फॅबटेक शुगरकडून २०१७-१८ या गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे उर्वरित प्रती टन १०० रुपयांचे ऊसबिल दिलेले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखानास्थळावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. थकीत ऊसबिल ताबडतोब दिले जाईल, असे आश्‍वासन कारखाना प्रशासनाकडून दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

फॅबटेक शुगरकडून २०१७-१८ या गळीत हंगामात प्रतिटन दोन हजार २५० रुपयांप्रमाणे दर देण्यात आला. हा दर देत असताना काही शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपयांप्रमाणे दर कमी देण्यात आला. सर्वच शेतकऱ्यांना समान दर देण्यात यावा, यासाठी शेतकऱ्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यानंतर उर्वरित ३०० रुपये ऊसबिलातील २०० रुपयांप्रमाणे ऊसबिल देण्यात आले. आता राहिलेले १०० रुपये मिळावेत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. 

या ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल घुले, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, रणजीत बागल, विजयकुमार पाटील, राजेंद्र बाळू कपले, शंकर संगशेट्टी, अप्पू पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

आश्‍वासनानंतर आंदोलन मागे  

कारखान्याकडे आता काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांच्या लेखी मागणीप्रमाणे थकीत ऊसबिल देण्याची ग्वाही वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com