स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलन

संग्रामपूर तहसीलसमोर आंदोलन करताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.
संग्रामपूर तहसीलसमोर आंदोलन करताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.

बुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन कापसाची नुकसानभरपाई या मागण्यांसह इतर बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. १८) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभर तहसीलसमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन झाले.   राज्य शासनाने बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. परंतु काही भाग दुष्काळातून वगळण्यात आले. तसेच जेथे दुष्काळ जाहीर केला त्या ठिकाणी अद्याप एकाही दुष्काळी योजनाची अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा हवेत विरली, शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याबाबत सरकारने कोणतेही नियोजन केले नाही.  सोयाबीन, कापसाची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, या प्रश्नांवर बुलडाणा येथे २ डिसेंबर रोजी स्वाभिमानीच्या विदर्भ मराठवाडा विस्तारीत राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. १८) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात या भागात आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  ...या होत्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये थेट खात्यात जमा करा, जनावरांच्या दावणीला चारा द्या, बँका, मायक्रो फायनान्सची सक्तीची वसुली बंद करा, गावा-गावात पिण्याची पाण्याची व्यवस्था करा, शेतमजुरांच्या हाताला काम द्या,  शेतकऱ्याची वीजबिल वसुली त्वरित बंद करा,  दुष्काळी उपाय योजनांची त्वरित अमलबजावणी करा, शेतकऱ्याच्या पीकविम्याचे पैसे खात्यात जमा करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com