पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी’चे गनिमी काव्याने आंदोलन
सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली असून कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने आंदोलनाला सुरवात केली आहे. अंकलखोप तालुका पलूस येथून उदगिरी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास कारखान्याकडे जाणारी चाळीस ऊसाचे ट्रॅक्टर अडवून धरले. जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ऊस दराबाबत आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील एकही साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले नाही. ऊस दर ठरत नाही, तोपर्यंत ऊस तोडी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील ऊस तोडी सुरूच आहे. पलूस तालुक्यात उदगिरी साखर कारखान्याची ऊसतोड सुरू आहे.
उदगिरी कारखान्याकडे जाणारे सुमारे ४० ट्रॅक्टर अंकलखोप तालुका पलूस येथे दडवून ठेवण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका आहे. ऊस तोडणी मजूर व ट्रॅक्टर पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला ते स्वतः जबाबदार राहतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचे आंदोलन गनिमी काव्याने सुरू केले आहे.
दिवसभर फडात ऊस तोडून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून चाकातील हवा सोडून देण्यात येत आहे.