मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर आत्मक्लेष आंदोलन
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून आत्मक्लेष आंदोलन केले.
बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी आणि दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढून आत्मक्लेष आंदोलन केले.
विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजू शेट्टी यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात कार्यकर्त्यांनी झाडावर चढून केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा डिक्कर यांनी दिला.
या आंदोलनामध्ये युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, नयन इंगळे, विलास बोडखे, मनोहर मोरखडे, प्रशांत बावस्कर, गोकूळ गावंडे, अमोल आगरकर, गजानन सोळे, प्रमोद बान्हेरकर, जया ठाकरे, विष्णुदास मुरुख, विशाल गव्हाळे, शिवचरण बान्हेरकर, निखिल गावंडे, महादेव तेल्हारकर, उमेश नेरकर,प्रतिक उमाळे, दामू सोळे, अक्षय नेरकर, शुभम ठाकरे आदी उपस्थित होते.
- 1 of 1029
- ››