‘स्वाभिमानी’चा मोर्चा स्थगित

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला जाणारा आक्रोश मोर्चा सोमवारी (ता.२३) स्थगित करण्यात आला आहे. या आंदोलनासाठी साताऱ्यात आलेल्या राजू शेट्टींनाही रजतांद्री हॉटेलवरच पोलिसांनी रोखले आले.
swabhimni morcha
swabhimni morcha

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला जाणारा आक्रोश मोर्चा सोमवारी (ता.२३) स्थगित करण्यात आला आहे. या आंदोलनासाठी साताऱ्यात आलेल्या राजू शेट्टींनाही रजतांद्री हॉटेलवरच पोलिसांनी रोखले आले. सकाळपासून पोलिसांची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर चाललेली शिष्टाई, आणि प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानंतर मार्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  उसाला एकरकमी एफआरपी जाहीर करावी, हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना २०० रुपये द्यावेत, लॉकडाउन काळात आलेली वाढीव वीज बिले माफ करावीत, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी सातारा ते कऱ्हाड पायी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात पोवईनाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन होणार होती. कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. त्यांना राजू शेट्टींची प्रतिक्षा होती. परंतु, साताऱ्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोवईनाका येथील हॉटेलमधील एका खोलीत नेले. त्याठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी आगोदरच उपस्थित होते.  बंद खोलीत पोलिस अधिकारी आणि श्री. शेट्टी यांच्यात आंदोलनाच्या स्थगितीबाबत शिष्टाई सुरु होती. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फौजदारी शाखेचा एक कर्मचारी नायब तहसीलदार ए. ए. भुसे यांच्या सहीचे पत्र घेऊन हॉटेलमध्ये दाखल झाला. त्याने सदर पत्र शेट्टी यांना दिले. सध्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता सुरु आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे मोर्चा रद्द करावा, अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली होती. या पत्रावर पोलिस अधिकारी व शेट्टी यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

प्रतिकात्मक मोर्चा श्री. शेट्टी व पदाधिकाऱ्यांनी पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. अभिवादनानंतर ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात आला. या वेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आक्रोश मोर्चा स्थगित केल्याची घोषणा केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com