जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी नेले (ता. सातारा) येथे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.
सातारा : कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी नेले (ता. सातारा) येथे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.
या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
शेळके म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाना येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत मोर्चा काढला आहे. या मोर्चात लाखो शेतकऱ्यांनी सहभागी होत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत ठिय्या मांडला आहे.
केंद्र सरकारने बळाचा वापर करत शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. केंद्र सरकारच्या अमानुष प्रवृत्तीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.’’
- 1 of 1022
- ››