दडपशाहीविरुद्ध ‘स्वाभिमानी’चा औरंगाबादमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा

सरकारच्या दडपशाहीविरुद्ध ‘स्वाभिमानी’चा औरंगाबादमध्ये सोमवारी होणार आक्रोश
सरकारच्या दडपशाहीविरुद्ध ‘स्वाभिमानी’चा औरंगाबादमध्ये सोमवारी होणार आक्रोश

परभणी : ‘‘लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून सरकारने दडपशाही केली. सरकारच्या या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी, पीकविमा परतावा द्यावा, यासाठी सोमवारी (ता. १६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,’’ अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी रविवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघनटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, बाळासाहेब आळने, शेख जाफर, शे. इर्शाद, शिवलिंग बोधने आदी उपस्थित होते.

मोरे म्हणाल्या, ‘‘मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. महिला आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने मुस्कटदाबी केली. सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, पीकविमा परतावा द्या, मजुरांच्या हाताला काम द्यावे, आदी मागण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील क्रांती चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी होतील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com