Agriculture news in Marathi, swabhimani Request police for take action on 'Kadaknath' | Page 2 ||| Agrowon

‘कडकनाथ’प्रकरणी कारवाई करण्याचे स्वाभिमानीचे साताऱ्यात निवेदन 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलासह तिघांना आरोपीऐवजी बेकायदेशीरपणे साक्षीदार बनविण्याचा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास, तसेच या गुन्ह्याला एमपीआयडी कायद्याचे कलम तातडीने न लावल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

सातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलासह तिघांना आरोपीऐवजी बेकायदेशीरपणे साक्षीदार बनविण्याचा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास, तसेच या गुन्ह्याला एमपीआयडी कायद्याचे कलम तातडीने न लावल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात ७२ शेतकऱ्यांची सुमारे एक कोटी ४८ लाख २३ हजार ५१९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये सागर खोत याच्या नावाचा सहा क्रमांकाचा आरोपी म्हणून समावेश होता; पण त्याच्यासह अन्य दोन लोकांची नावे राजकीय दबावापोटी संगणकीय चूक दाखवून आरोपीतून काढून साक्षीदार करण्याचा प्रकार पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. 

सत्तेशी संबंधितांचा यात समावेश असल्याने हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होणार, अशी सर्वसामान्याची भावना आहे. अशातच पाटण पोलिसांनी असे कृत्य केले आहे. त्यामुळे अन्याग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या गुन्ह्यातून विना तपास कोणाचीही नावे वगळण्यात येऊ नयेत, नावे वगळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच या गुन्ह्याला एमपीआयडी कायद्याची कलमे लावण्यात यावी. या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १६ सप्टेंबर) पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...