नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारविरुद्ध ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर

 'Swabhimani' on the road against the central government in Nashik
'Swabhimani' on the road against the central government in Nashik

नाशिक : मोठी आश्‍वासने देऊन भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली. शेतीमालाला हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे ओरडून सांगितले. मात्र पाच वर्षांत केंद्र सरकारने काहीही केले नाही. आता शेतकरी पूर्ण भरडला गेल्याने सरकारने शेतकऱ्याची फसवणूक थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. सरकारविरोधात निदर्शने करून सडाडून टीका केली. या वेळी केंद्र सरकारविरुद्ध ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. 

निफाड तालुक्यातील कोकणगाव फाटा येथे बुधवार (ता. ८) आंदोलन करण्यात आले. द्राक्ष, डाळिंब, कांदा, भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे येथील शेतकऱ्यांची व्यवस्था उद्‍ध्वस्त झाली, असे सांगून कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

सुरुवातीला कार्यकर्ते मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा पवित्र्यात होते; मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. रास्ता रोको केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी समज पोलिस निरीक्षक संजय महाजन यांनी दिली. नंतर आंदोलन पार पडले. 

पहा आंदोलनाचा video..  

यूपीए सरकारपेक्षा एनडीए सरकारच्या कारकिर्दीत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर उद्योजकांचे असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस सोमनाथ बोराडे यांनी केली.

सरकारने शेतकरी विरोधी आरईसीपी करार देशात मान्य करण्याचा घाट घातला आहे. हा करार लागू झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडून आत्महत्यांचे सत्र वाढेल, असे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल यांनी सांगितले. यावर सरकारने तातडीने विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन पदाधिकाऱ्यांच्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय महाजन, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे यांच्याकडे सुपूर्त करण्यात  आले.

कोकणगाव फाटा येठे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी व माधव खंडेराव मोरे यांनी पाहिले आंदोलन उभारले होते. याच पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ठिकाणी आंदोलन पुकारल्याचे स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने

स्वाभिमानीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, कार्यकारणी सदस्य साहेबराव मोरे, भाऊसाहेब तासकर, माजी जिल्हा सचिव संपत जाधव, निफाड तालुका संघटक गजानन घोटेकर, सुभाष गायकवाड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

प्रमुख मागण्या 

  • संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे
  • अवकाळी पावसाची नुकसानभरपाई द्या
  • केंद्र शासनाचा आरईसीपी करार त्वरित रद्द व्हावा  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com