ऑक्‍टोबर अखेरीस स्वाभिमानीची ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटना
स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोल्हापूर : साखर हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाची ठरणारी यंदाची ऊस परिषद ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

गेल्या वर्षभरात साखरेच्या सातत्याने वाढत्या दरामुळे स्वाभिमानीकडून यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दराची मागणी केली जाण्याची शक्‍यता आहे.

सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून याची तयारी सुरू असून, गेल्या वर्षीचा साखर हंगामाचा ताळेबंद तपासला जात आहे. यानुसार यंदा एफआरपीपेक्षा जादा दराची मागणी निश्‍चितपणे होण्याचा अंदाज संघटनेच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

याबाबत अधिकृत माहिती या परिषदेतच देण्यात येणार आहे. साखरेचे एकूण उपपदार्थ व अन्य अनुकूल बाबींमुळे यंदा एफआरपीपेक्षा टनाला तीनशे ते चारशे रुपये जादा देणे कारखान्यांना शक्‍य होणार असल्याने जास्तीत जास्त दर मिळविण्यासाठी संघटना प्रयत्न करेल, असेही सांगण्यात आले. संघटना उभारणार आक्रमक नीती गेल्या सहा महिन्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये अनेक घडामोडी घडल्या. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीनंतर उसाचा मुद्दा बाजूला पडून एकमेकांवर कुरघोडीच्या बातम्याच अधिक आल्या. ऊस परिषदेत या घटनेचे पडसाद उमटणार असले, तरी ऊसदराच्या मूळ प्रश्‍नावर अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न स्वाभिमानीचा असणार आहे. भाजप सरकार राहणार टार्गेट केंद्रातील सरकारने यंदा साखर उद्योगाच्या बाबतीत अनेक अनाकलणीय निर्णय घेतले. आयात साखरेस मंजुरी हाही एक महत्त्वाचा निर्णय होता. यंदा उसाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता असूनही आयातीला परवानगी दिली. हा निर्णय चुकीचा असल्याने या निर्णयाच्या विरोधातही संघटना आक्रमक राहणार आहे. सरकारने या उद्योगाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचा तपशील सभेत मांडण्यात येणार असल्याचे स्वाभिमानीच्या सूत्रांनी सांगितले. कारखान्यांचा हिशोब मागणार ७०:३० च्या फॉर्म्युलाने अनेक कारखान्यांनी दर दिला आहे. गेल्या वर्षीही साखरेचे दर चांगले होते. याचा हिशेब करून गेल्या वर्षीच्या उसालाही एफआरपीव्यतिरिक्त जादा दर मिळू शकतो. या जादा दराची मागणी करून गेल्या वर्षीचा हिशेब संघटनेच्या वतीने मांडण्यात येणार आहे. यामुळे गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसालाही जादा दर मिळविण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com